Tuesday, February 13, 2024

सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वसंत ऋतूचा बहर.

 सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वसंत ऋतूचा बहर.

मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठीनेहमी विविध विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेआशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्‍या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळतेफेब्रुवारी महिना हा सगळ्यांसाठीच खास असतोसगळीकडे प्रेमाचे वातावरण बहरलेले असतेवेलेंटाईन डे जवळ आला की प्रेमाचे गुलाबी वातावरण सगळीकडे निर्माण होतेमालिकांमधील निरनिराळ्या जोड्यांमध्येदेखील प्रेमाची कबुली वेलेंटाईन डेनिमित्त दिली जाईल काहे पाहणे प्रेक्षकांसाठी खास असेल.  ते अनुसरूनच सोनी मराठीवरील मालिकांमध्ये प्रेमाची कबुली दिली जाणार आहे.



                'तुजं माजं सपानमालिकेत प्राजक्ता आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता धडपड करत आहेतिला कुस्ती अकादमी सुरू करायची आहे आणि आता वीरू तिला यासाठी मदत करणार आहेतिला पाठिंबा देणार आहेएकंदर त्यांच्यात जवळीक निर्माण होणार आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणीमालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्यात दिवसेंदिवस प्रेमाचे रंग बहरणार आहेतपण त्यात आता जोजोच्या येण्याने मयूरीच्या मनात असलेले प्रेम ती राजवीरसमोर काबूल करणार काहे पाहायला मिळेलवेलेंटाईन डेनिमित्त राजवीर आणि मयूरी हे चक्क कोळीवाड्यात विशेष नाचताना दिसणार आहेतप्रेक्षकांना ही विशेष पर्वणी असेलआता मयूरी प्रेमाची कबुली देणार काहे मालिकेतच पाहायला मिळेल. 'राणी मी होणारमालिकेत मीरा आणि मल्हार यांचे लग्न झाले असूनदेखील आपल्या अस्तित्वासाठी लढणारे मीरा आणि मल्हार यांच्यातदेखील प्रेमाचे रंग बहरणार आहेतमीरा आपल्या मनातल्या गोष्टी मल्हारला सांगणार असून आपल्या प्रेमाची कबुली ती मल्हारला देणार आहेत्यामुळे मीरा आणि मल्हार यांच्यात जवळीक निर्माण होताना प्रेक्षकांना दिसेल. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नंमालिकेत बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आहेडॉक्टर होण्याच्या या प्रवासात तिला अनेक जणांचा पाठिंबा आहेतर अनेक जण तिच्या स्वप्नाच्या आड येत आहेत.  डॉक्टर विशालदेखील तिला उत्तम सपोर्ट करत आहेपण इराला ते बघवत नाही कारण तीदेखील डॉक्टर विशालच्या प्रेमात असून ती वेलेंटाईन डेनिमित्त विशालला आपल्या मनातील सांगण्याची तयारी करतेपण काही करणामुळे इरा पोहचू शकत नाही आणि बयो तिच्याऐवजी जाणार आहेत्यामुळे बयो आणि विशाल यांच्यात काही विशेष घडणार काहे पाहायला मिळेल.

           एकंदर सोनी मराठी वाहिनी या वेलेंटाईन डेनिमित्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विशेष असे मालिकांचे भाग घेऊन येत आहेपाहायला विसरू नका वेलेंटाईन डे विशेष  'तुज माजं सपान',  'अबोल प्रीतीची अजब कहाणी', 'राणी मी होणारआणि 'छोट्या बयोची मोठी स्वप्नंमालिकांमधील वसंत ऋतूचा बहर फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...