Wednesday, April 17, 2024

निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट.

 निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट.

निवेदिता माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.


              मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठीनव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सोनी मराठी एक नवी मालिका'निवेदितामाझी ताई!' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलीही गोष्ट एका अशा नात्याची आहे जी घराघरांत घडते.. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं... एक असं निरपेक्ष नातंजे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं... ते नातं म्हणजे... बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातंबहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित अशी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण मालिका आहेअसीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहेपण मालिकेत एक रंजक वळण आलं आहेते म्हणजे निवेदिताचं लग्ननिवेदिताचं लग्न झाल्यावर ती असीमपासून दुरावली जाणार काअसा प्रश्न सगळ्यांना पडला आहेपण निवेदिताचं लग्न मकरंदसोबत ठरलं आहेमकरंदला निवेदितासोबत लग्न करायचं आहेपण तो सायको असल्याचं यशोधनला समजतंयशोधन पुरावे जमा करतो आणि निवेदिता आणि मकरंद यांच्या लग्नात येऊन मकरंदचं पितळ उघडं पाडतो..


             ऐन लग्नात धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहेनिवेदिताचं लग्न कसं पार पडणारहे प्रेक्षकांना पाहायला मिळेलमकरंदसोबतचं लग्न मोडून मकरंदचा प्लॅन हाणून पाडण्यात यशोधनला यश मिळेल कात्याचं निवेदितावर असलेलं प्रेम यातून त्याला व्यक्त करता येईल काहे आपल्याला पाहायला मिळेलमकरंदने रचलेला प्लॅन अखेर निवेदिता आणि त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत येऊन ठेपला आहेपण त्याचं या आधीचं लग्न आणि त्याने आखलेला प्लॅन यांबाबत निवेदिता आणि तिच्या घरचे अजूनही अनभिज्ञ आहेतयशोधन सगळे पुरावे जमा करून मकरंदचा प्लॅन भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करेलपण यामुळे निवेदिता आणि मकरंद यांचं लग्न मोडण्यात त्याला यश मिळेल कायापुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे निवेदिताच्या लग्नाचायशोधन सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करून निवेदितासोबत लग्नाला उभा राहणार असून निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहेपण या सगळ्यांत असीमची जबाबदारी कोण घेणारहा प्रश्न उभा राहणार आहेयशोधन असीमची जबाबदारी नक्की घेईलअसा निवेदिताचा समाज आहे.

            निवेदिता आणि यशोधन यांचा विवाहसोहळा पाहायला नक्की यापाहायला विसरू नका 'निवेदिता माझी ताई!' सोमवार ते शुक्रवार रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...