Saturday, April 20, 2024

अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका. नवी मालिका, 'जय जय शनिदेव'

 अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका.

नवी मालिका, 'जय जय शनिदेव', 8 मेपासूनसोमते शुक्र., रात्री 9.30 वाआपल्या सोनी मराठीवर!

 

                                   सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतेआजवर पौराणिकऐतिहासिकथरारकइत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेतत्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. 'जय जय शनिदेवअसे या मालिकेचे नाव आहेजीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहेअभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहेयाआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेतपण प्रमुख भूमिका म्हणून 'शनिदेवही संकेतची पहिलीच भूमिका आहेविशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगर चा असून 'जय जय शनिदेवमालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेलकाही दिवस आधी 'जय जय शनिदेवमालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळालीशनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होतीपण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहेत्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहेहे कळतं आहेशनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहेसोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहेप्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहेशनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुखशांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करतेशनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही मेपासून तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहेजीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहेसंकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतोते आपल्याला पाहायला मिळेलत्यामुळे पाहायला विसरू नका, 'जय जय शनिदेव',  मेपासून रात्री .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

  ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणा...