Thursday, January 17, 2019


झी घोषणा करत आहेत झी फॅमिली पॅक्सवर आकर्षक ऑफर आता केवळ रू.३९* प्रति महिना

·        भारतातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर झील घेऊन येत आहेत अनेक ग्राहक-केंद्री पॅक्स जे प्रदान करतात मोठे मूल्य. झी फॅमिली पॅकमध्ये २३ वाहिन्या आता केवळ रू.३९* प्रति महिना अशा आकर्षक लाँच ऑफरमध्ये उपलब्ध आहेत.
·        झी फॅमिली पॅक्स प्रदान करत आहेत दैनंदिन पाहिले जाणारे सर्वोत्तम कार्यक्रम प्रकार - मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत आणि जीवनशैली, त्यामुळे ग्राहकांकडे हे मासिक पद्धतीने असायलाच हवेत.

मुंबई, जानेवारी १७, २०१९: १ फेब्रुवारी २०१९ पासून नवीन भाडे किंमती प्रणाली लागू होणार असून देशातील प्रथम क्रमांकाच टेलिव्हिजन नेटवर्क झी ने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक लाँच ऑफर्स आणल्या आहेत. झी फॅमिली पॅक्स हे केवळ रू.३९* ला- उपलब्ध आहेत. सुरूवातीची ही खास ऑफर सर्व हिंदी भाषिक राज्ये, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांसाठी बनवण्यात आली आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे टेलिव्हिजन नेटवर्क झील यांनी नवीन किंमती पद्धतीचे नेतृत्व केले आणि सर्वप्रथम अनेक ग्राहककेंद्री पॅक्स आणि मागणीवर आधारित वाहिन्यांच्या किंमती जाहीर केल्या. आता ह्या आकर्षक अशा सुरूवातीच्या ऑफरसह झी आपल्या ग्राहकांसाठी अधिक मूल्य आणि किफायतशीरपणा प्रदान करत आहेत.

झी कडे तीन प्रकारचे पॅक्स असून ते अतिशय आकर्षक किंमतींमध्ये उपलब्ध आहेत. झी प्राईम पॅक तामिळएसडी ८ वाहिन्यांसाठी केवळ रू.१०*, झी फॅमिली पॅक  हिंदी एसडी  २३ वाहिन्यांसाठी रू.३९* तर झी ऑल-इन-वन एसडी पॅक सगळे २६ चॅनल्स केवळ रू.५९* मध्ये प्रदान करतो. झी फॅमिली पॅक मध्ये परिवारातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक दिवशी मनोरंजन प्रदान करणारे मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत आणि जीवनशैली अशा प्रकारांमधील झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही, झी सिनेमा, अॅन्ड पिक्चर्स, झी बॉलिवूड, झी न्यूज, झी अनमोल, बिग गंगा, झिंग, लिव्हिंग फूड्‌झ आणि अशा अनेक अग्रगण्य वाहिन्यांचा समावेश आहे. झी सिनेमा, अॅन्ड पिक्चर्स, झी टॉकीज, झी युवा आणि झी बांग्ला सिनेमा अशा काही वाहिन्यांसाठीच्या आलाकार्ट दरांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

झी च्या अफिलिएट सेल्सचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री.अतुल दास म्हणाले, “झी हे देशातील प्रथम क्रमांकाचे नेटवर्क आहे. मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत आणि जीवनशैली अशा विभिन्न प्रकारांत आणि हिंदी, मराठी, बंगाली, ओरिया, भोजपुरी, पंजाबी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्आणि इंग्रजी अशा भाषांमधील कॉन्टेन्टमध्ये आम्ही नेहमीच अभिनवता आणण्याचा प्रयत्न करतो. १ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होत असलेल्या नवीन दरप्रणालीमुळे वाहिन्यांच्या किंमतींच्या बाबतीत ही दरप्रणाली पारदर्शकता आणते तर दुसऱ्या बाजूला ज्या वाहिन्या पाहायच्या आहेत त्याचसाठी किंमत अदा करण्याची पूर्ण स्वायत्तता ग्राहकांना मिळते. ग्राहकांना अशा वेळेस अधिक मूल्य प्रदान करण्यासाठी आम्ही हिंदी, मराठी, बांग्ला आणि ओरिया ह्या भाषांमध्ये आकर्षक लाँच ऑफर आणली आहे. हे पॅक्स आता रू.३९* प्रति महिना ह्या खास दरात उपलब्ध असतील. सर्वोत्तम टेलिव्हिजन मालिका, नाट्‌य, फिचर फिल्म्स, बातम्या, जीवनशैली कॉन्टेन्ट आणि अद्‌भुत नवीन अनुभव आमच्या देशभरातील ग्राहकांसाठी अधिक मूल्यासह प्रदान करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.”

दररोज १४. करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या ११ भाषांमधील एकूण ५९ वाहिन्या (४३ एसडी आणि १६ एचडी) वाहिन्यांसह झील भारतातील प्रेक्षकांना सर्व प्रकारचे सुपरहिटमनोरंजन प्रदान करत आहे. हिंदीमधील प्रग्या, प्रीता, झारा सिद्दिकी किंवा भाभीजी असो, मराठीतील राधिका, बांग्लामधील रानी राश्मोनी असो आणि प्रत्येक क्षेत्रातील अशा आमच्या अशा अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्यासोबत जोडल्या गेल्या असून दररोज रात्री जेवताना त्यांची भेट होत असते. सर्व गरजा पूर्ण करणारे प्रथम क्रमांकाचे टीव्ही नेटवर्क झी असून आपल्या फॅमिली पॅक्ससोबत ते प्रत्येक परिवारासाठी हव्याच अशा मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत आणि जीवनशैली अशा सर्व सर्वोच्च प्रकारांमधील सुपरहिट वाहिन्यांना सुयोग्य पद्धतीने एकत्र आणते.


SD/HD
SD
HD
Language
Prime
Super
Family
All-in-One
Prime
Super
Family
All-in-One
Hindi


39
59


60
85
English Only
25



35



Marathi


39
59


80
105
Bangla


39
59


70
95
Odia


39
59


65
90
Tamil
10
20
37
66
25
35
65
95
Telugu
20
26
45
66
35
45
70
100
Kannada
17
24
45
66
25
35
70
100
Tamil - Telugu
25
35
55
76
40
50
80
110
Tamil - Kannada
25
35
55
76
40
50
80
110
Telugu – Kannada
28
35
55
76
40
50
80
110
All South
34
45
65
85
50
60
90
120
Odia-Telugu


59
79


80
110
Marathi-Kannada


59
79


90
120





१५ कोटींहून अधिक भारतीयांना गुडघ्यात संधिवाताचा त्रास
भारतात २०२२ पर्यंत वर्षाला १ दशलक्ष गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतील

मुंबई, १७ जानेवारी २०१९ – भारतात सुमारे १५ कोटींहून अधिक देशवासी गुडघ्याच्या संधीवाताने त्रस्त आहेत, ज्यापैकी जवळपास ४ कोटी रुग्णांना नी-रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण- टीकेआर)ची गरज आहे. ज्यामुळे देशावर मोठा आरोग्यविषयक ताण असल्याचे जाणवते. या उलट चीनमध्ये साधारण ६.५ कोटी लोकांना संधिवाताची गुडघेदुखी आहे. भारताच्या तुलनेत निम्याहून कमी! पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात १५ पटीने अधिक या गुडघेदुखीचे रुग्ण आढळतात. भारतीयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संधीवाताची समस्या ही अनुवंशिकतेमुळे तसेच जीवनशैलीत गुडघ्याच्या अधिक वापरापायी होते. असे शालबाय हॉस्पिटल्स, संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम शहा म्हणाले.

डॉ. विक्रम शहा म्हणाले की, “मागील २० वर्षांपासून भारतात गुडघे प्रत्यारोपणात अद्वितीय प्रगती झाली, तरीही मागणी वाढतेच आहे. जणूकाही देशात गुडघ्याच्या संधिवाताची साथच आली आहे. भारतात हा आकडा केवळ १५०,००० आहे. तरीच ही मोठी झेप म्हणावी लागेल. कारण १९९४ मध्ये भारतात फक्त ३५० नी-सर्जरी झाल्या होत्या. ज्या वेगाने भारतात गुडघ्याच्या संधिवाताची समस्या वाढते आहे, ती पाहता वर्षाला एक कोटी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे अपेक्षित आहे. यासंबंधी तुलना करता भारतात २०२२ पर्यंत वर्षाला केवळ १ दशलक्ष शस्त्रक्रिया होतील. आजच्या काळात गुडघे प्रत्यारोपणात संसर्गात होण्याचा आकडा अतिशय कमी आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये फार काळ राहावे लागत नाही.”

ते म्हणाले की: “पुढील दशकभरात गुडघ्याचा संधिवात हा शारीरिक विकलांगतेचे सर्वसाधारण कारण ठरेल. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तसेच ऑर्थोपेडीक तज्ज्ञांची असलेली वानवा यामुळे देशातील आरोग्य ताण कठीण होईल. भारतात स्वातंत्र्य काळानंतर सर्वसाधारण आयुष्यमान वाढले असल्याने गुडघ्याचा संधिवात बळावण्यामागचे हे प्रमुख कारण म्हणता येईल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशातील वयस्कर लोकांना गुडघे प्रत्यारोपणाकडे वळावे लागत आहे.”

डॉ. विक्रम शहा म्हणाले: “भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आर्थरायटीसमध्ये कार्टीलेज झिजणे-भंग होणे सर्रास आढळते. ज्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना त्रास होतो. भारतीय महिलांमध्ये, वयाच्या पन्नाशीत गुडघ्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात होते. तर पुरुषांमध्ये हा त्रास साठीत जाणवू शकतो. महिलांमध्ये हा विकार जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आणि अपुरे पोषण हे असते. अंदाजे ९०% भारतीय महिलांमध्ये ड-जीवनसत्वाची कमतरता असते. हाडांच्या कार्यवहनात हा घटक महत्त्वाचा ठरतो. भारतीय पारंपरिक जीवनशैली देखील गुडघ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरते. पालथे बसणे, मांडी घालून बसणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर, चालताना योग्य पद्धतीच्या पादत्राणांचा वापर न करणे, यामुळे गुडघ्याचा वापर अधिक होऊन गुडघ्यांवर वाजवीपेक्षा अधिक ताण येतो.”

डॉ. विक्रम शहा पुढे म्हणाले की, “संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वी आहे. तिचा उपयोग अर्ध्या शतकापासून करण्यात येतो आहे. याचा यशस्वी दर ९५% इतका असून त्यामुळे रुग्णाच्या जीवनात बदल दिसून येतो. अलीकडच्या काळात नी-आर्थोप्लास्टीमध्ये अनेक नवीन सुधारणा घडल्या आहेत. उदाहरणार्थ, पेशंट-स्पेसीफिक इन्स्ट्रुमेन्ट्स (रुग्णानुरूप शस्त्रक्रिया साधने), जेंडर-स्पेसीफिक नी (रुग्णाच्या लिंगानुरूप गुडघे), कमी काप-छेद येतील अशी शस्त्रक्रियेची तंत्र, त्याचप्रमाणे संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्यासाठी रोबोचा वापर. अर्थात हे अतिशय खर्चिक आहे, परंतु अनुभव एखाद्या साधारण प्रत्यारोपणासारखा येतो. गुडघे प्रत्यारोपण करण्यातील सर्जनचा अनुभव आणि त्याच्या कौशल्याची जागा इतर कोणताही पर्याय घेऊ शकत नाही. ज्याचा लाभही शेवटी रुग्णाला मिळतो. जर रुग्णांनी सर्जनसह योग्य हॉस्पिटलची निवड केली तर पारंपरिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण करणे हा कायम श्रेयस्कर तसेच किफायतशीर पर्याय ठरतो.”



Make way for Ravi Dubey as the new host of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs

~It’s always good to be back home says the actor~

After ruling reality television and winning audiences over with melodious renditions and dhamakedaar performances by some phenomenally talented child singers from across the country, Zee TV’s No 1 singing reality show Sa Re Ga Ma Pa Li’l Champs is back. The last season of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs enjoyed an immensely successful run of over nine months, constantly topped viewership charts and introduced audiences to fine singers like Shreyan Bhattacharya, Anjali Gaikwad and ‘Chhote Bhagwaan’  Jayas Kumar amongst others. Taking the legacy of recognizing child singers and giving them a platform to discover their talent at such a young age forward, the show once again has set out to scout for a fresh new batch of young music aspirants. The latest on the new season of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs is that the show is all set to welcome the lady-killer, heartthrob of millions - Ravi Dubey on board as their new host.

The very talented Ravi Dubey who has been winning hearts with his acting and hosting skills is happy to be back on Zee TV 3 years after playing the title role in one of the most popular shows on Indian television - Jamai Raja. He said, “I share a strong connection with kids and really enjoy being around them. I decided to be part of the show because 23 years after its first season went on air, Sa Re Ga Ma Pa continues to be the most definitive platform for singing in the country.  It has managed to stay relevant for audiences by constantly reinventing itself and I have great regards for the calibre of talent the show has picked and groomed over the years.” He added, “I thoroughly enjoy hosting as much as I love acting and over the years, I have developed a certain penchant for hosting television shows. I am happy to be a part of a prestigious show like Sa Re Ga Ma Pa Li’l Champs and considering I’ve been an integral part of Zee TV’s journey over the years, it’s always good to be back home.”

Here's wishing Ravi all the very best for hosting in new season of Sa Re Ga Ma Pa Li’l Champs!

Sa Re Ga Ma Pa Li’l Champs will air soon on Zee TV!









'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...