Monday, September 26, 2022

मन कस्तुरी रे'तून दरवळणार अभिनय-तेजस्वीच्या प्रेमाचा सुगंध

मन कस्तुरी रे'तून दरवळणार अभिनय-तेजस्वीच्या प्रेमाचा सुगंध 

नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे 'मन कस्तुरी रे'चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने 'मन कस्तुरी रे' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या' मन कस्तुरी रे' चा सुगंध सर्वत्र दरवाळणार, हे नक्की! 

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.

नायकाचा सौंदर्य व्यावसायिकांसाठीचा आशय आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म

व्यावसायिक सौंदर्य करिअरला चालना देण्यासाठीनायका-प्रो तर्फे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नायकाचा सौंदर्य व्यावसायिकांसाठीचा आशय आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म नायका-प्रो ने द प्रोफेशनल मेकअप कोर्स नावाचा प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. सौंदर्य प्रशिक्षणात निपुण असलेल्या भारतातील अग्रगण्य एड-टेक प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या एअरब्लॅकच्या भागीदारीत तयार करण्यात आलेला प्रोफेशनल मेकअप कोर्स हा अशा सौंदर्य व्यावसायिकांसाठी आहे जे स्वत:चे कौशल्य वाढवण्याची आणि मेकअप ट्रेंड विकसित करण्यामध्ये पुढे राहण्याची संधी शोधत आहेत. हे सादरीकरण नायका-प्रो च्या भारतातील सौंदर्य व्यावसायिक समुदायाच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्याच्या आणि पाठबळ देण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

८ आठवड्यांच्या नायका प्रो X एअरब्लॅक या प्रगत अभ्यासक्रमामध्ये वधूपासून ते अरेबियन ब्राइडल, फॅशन एचडी मेकअप, फॅन्टसी मेकअप, प्रोस्थेटिक्स आणि स्पेशल इफेक्ट्सच्या विविध लुकमध्ये थेट प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमामध्ये दोन मॉड्यूल्स देखील आहेत जे व्यावसायिकांना त्यांच्या इनस्टाग्राम पोर्टफोलिओ बिल्डिंगची कौशल्ये सुधारण्यास, प्रो व्हिडिओ आणि रील्स आणि क्लायंट व्यवस्थापनाची तत्त्वे तयार करण्यात मदत करतील. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागींना एक प्रमाणपत्र मिळेल जे त्यांना नायका प्रो आणि एअरब्लॅक ब्युटी क्लब सदस्यत्वांमध्ये प्रवेश प्रदान करेल.

श्री.विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, बी-टू-बी व्यवसाय-नायका म्हणाले, "आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया प्रवाह आणि आशय सतत नवनवीन मेक-अप तंत्र आणि लूकची मागणी वाढवत आहे. या स्पर्धात्मक उद्योगात यशस्वी होण्यासाठी तसेच अग्रणी आणि सुसंगत राहण्यासाठी कौशल्य वाढवणे महत्त्वाचे आहे अशी माहिती आम्हाला आमच्या नायका प्रो समुदायातील सौंदर्य व्यावसायिकांनीही दिली. सौंदर्य व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी योग्य शिक्षण तयार करण्यात कुशल असलेल्या एअरब्लॅक सोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. एकत्रितपणे या अभ्यासक्रमासह आमचे ध्येय अत्यंत स्पर्धात्मक सौंदर्य उद्योगात त्यांची भरभराट होण्यास मदत करणे आणि या प्रक्रियेत त्यांच्या व्यवसायाची वाढ, समृद्धी आणि ओळख निर्माण करणे हे आहे."

२०१८ मध्ये सादर केलेले नायका प्रो हे आज भारतातील प्रमुख सदस्यत्व-अग्रणी आशय आणि वाणिज्य व्यासपीठ आहे. सौंदर्य व्यावसायिकांना व्यावसायिक उत्पादने, विशेष ऑफर आणि ब्रँड मास्टरक्लास यांच्या विस्तृत वर्गीकरणाची माहिती देणे आणि त्यायोगे त्यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यात मदत करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.  नायका प्रो वर ६०,००० हून अधिक प्रमाणित सौंदर्य व्यावसायिकांनी त्यांच्या सर्व व्यावसायिक सौंदर्य गरजांसाठी विश्वास व्यक्त केला आहे. २७.८ हजारपेक्षा जास्त पिनकोड्समध्ये सर्वसमावेशक अनुभव सादर करत त्यांना ' प्रो सोबत वाढण्यास' सक्षम करत ४००० हून अधिक ब्रँड्समध्ये पसरलेल्या वर्गीकरणासह नायका-प्रो ला सौंदर्य व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यात सक्षम असल्याचा अभिमान आहे.

सहेला रे'... काही नात्यांना नाव नसतं

 'सहेला रे'... काही नात्यांना नाव नसतं 

 १ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर 

'प्लॅनेट मराठी' ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ' सहेला रे'चे  पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय. 'काही नात्यांना नाव नसतं', अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे. 

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या बाजू असून लवकरच प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा चित्रपट पाहाता येणार आहे.'' 

दुबईमध्ये झालेल्या 'एक्स्पो २०२० दुबई' या सोहळ्यात 'प्लॅनेट मराठी'च्या 'सहेला रे' या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते.  गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच ५ वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही 'सहेला रे'च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच पसंती दर्शवतील. अक्षय बर्दापूरकर व 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत 'सहेला रे'ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांचे आहेत.

Sunday, September 25, 2022

Director Mani Ratnam’s magnum opus ‘PS-1’

Director Mani Ratnam’s magnum-opus PS-1 is all set to release on 30th September. The curiosity amongst the viewers to watch the grandest celebration and tribute to the ‘Chola empire’ is reaching at the highest of heights since the trailer of the most-awaited historical drama came out. 

The entire star cast has been enthusiastically promoting the film, the makers of the film held a Special Press Conference in Mumbai last evening. The star-studded media Press Conference was attended by Director Mani Ratnam, Music Director AR Rahman, Chiyaan Vikram, Aishwarya Rai Bachchan, Jayam Ravi, Karthi and Trisha.

The star cast along with the makers shared their enthralling experience and hard work that went into the making of the film. 

Subaskaran’s Lyca Productions presents PS-1. Jointly Produced by Madras Talkies and Lyca Productions, Directed by Mani Ratnam, and Music Composed by AR Rahman. 

PS-1 is slated or a worldwide release on September 30, 2022, in Tamil, Hindi, Telugu, Kannada, and Malayalam.

Friday, September 23, 2022

Superstar Amitabh Bachchan and Neena Gupta’s chemistry on the most soulful track of Goodbye - Chann pardesi-

Superstar Amitabh Bachchan and Neena Gupta’s chemistry on the most soulful track of Goodbye - Chann Pardesi is something you cannot miss

https://bit.ly/ChannPardesi

The most-awaited family drama ‘GOODBYE’ starring Megastar Amitabh Bachchan and National Crush Rashmika Mandanna’ has been garnering tremendous love since its inception. The enchanting dramedy is connecting directly to the audience’s hearts and the audiences are eagerly waiting to watch the heartwarming journey of grief, love, and self-discovery magnificently depicted by the Bhalla family.

After elevating the audience’s excitement day by day through the teaser and trailer, the makers of the film released the most soulful track from their album - Chann Pardesi. The song showcases the beautiful chemistry between Amitabh Bachchan and Neena Gupta. After 40 years of working in the industry this is the first time veterans Amitabh Bachchan & Neena Gupta will be seen on-screen as a couple. The song portrays megastar Amitabh Bachchan reminiscing with a smile on his face and also grieving about the loss of his loved one. The song depicts Neena Gupta’s amusing as well as emotional side and how she always found a way to keep everyone around her happy with utmost care and love.

The song feels like a warm hug on a bad day and it’s sung and composed in the melodious voice of Amit Trivedi and the lyrics are penned by Swanand Kirkire.

Helmed by Vikas Bahl, the story of GOODBYE reminds you of the value of appreciating life and family under every circumstance through a comic lens and also proves the phrase ‘Family Above All’ at the same time. 

Produced by Ektaa R Kapoor’s Balaji Motion Pictures in association with Good Co. GoodBye is all set for worldwide release in cinemas on 7th October 2022.

बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

 'बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा 'बॉईज ३' हा चित्रपट एक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा धैर्या, ढुंग्या आणि कबीरने अवघ्या महाराष्ट्रात धमाका केला आणि यावेळी या त्रिकुटाला साथ दिली ती बिनधास्त अशा कीर्तीने. अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' या चित्रपटाला महाराष्ट्रभरात कमालीचा प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला असून बॉक्स ऑफिसवर 'बॉईज ३'ने  ४.९६ करोडची  तुफान कमाई केली आहे. एकदंरच सध्याचे चित्र पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असे अनेक मजबूत विकेंड मिळण्याची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये 'बॉईज ३'ची भलतीच क्रेझ दिसत असून चित्रपटगृहांमध्ये याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. अगदी सकाळचे शोजही 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत. 

चित्रपटाला मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल प्रस्तुतकर्ते आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते म्हणतात, " सध्या आमची 'बॉईज'ची टीम अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे आणि तिथून मिळणारा प्रतिसाद, प्रेम पाहाता चित्रपटाच्या सर्व टीमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळतेय. 'बॉईज १', 'बॉईज २' ला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आता 'बॉईज ३' ला तिपटीने वाढले आहे.  'बॉईज'ची ही धमाल आता लवकरच चौपट होणार आहे. चित्रपटात 'बॉईज ४' ची घोषणा आम्ही केली असून 'बॉईज ४' लाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळेल, अशी मला खात्री आहे."

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात  सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Samantha & Dev Mohan starrer Shaakuntalam is all set to release

Samantha & Dev Mohan starrer Shaakuntalam is all set to release on November 4

https://youtu.be/KZsG2wMbg6c

The massively mounted film Shaakuntalam based on internationally acclaimed Kalidasa’s Sanskrit play ‘Abhijnana Shakuntalam’ is all set to release in Hindi, Telugu, Tamil, Malayalam & Kannada.  The story of Shaakuntalam revolves around the epic love story of Shakuntala and King Dushyant from Mahabharata, portrayed by Samantha and Dev Mohan.

The first poster of the film came out recently and the audiences were mesmerized and their enthusiasm elevated to the highest level to watch this upcoming mythological drama.

The film is helmed by supremely proficient, Director Gunasekhar and marks a whimsical tale of love set in the Kashyapa Kanumalu (Kashmir), the grandeur and splendour of Dushyant’s Puru Dynasty making the film extremely exceptional.

Along with an alluring storyline, the film also has an accomplished starcast consisting of Sachin Khedekar Kabir Bedi, Dr.M.Mohan Babu Prakash Raj, Madhubala, Gautami, Aditi Balan, Ananya Nagalla and Jisshu Sengupta in pivotal roles. Another added attraction to the starcast is icon Star Allu Arjun’s daughter Allu Arha portraying the role of Prince Bharata.

Presented by Dil Raju under Sri Venkateswara Creations in collaboration with Gunaa Teamworks, Produced by Neelima Guna, and Written & Directed by Gunasekhar, the film is all set to release on November 4, 2022.

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...