Parineeti Chopra drops a glimpse from the intense training for her role in CodeNameTiranga
The movie is releasing in cinemas on 14th October 2022.
https://www.instagram.com/reel/Cje3mmIKk6U/?igshid=YmMyMTA2M2Y=
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Parineeti Chopra drops a glimpse from the intense training for her role in CodeNameTiranga
The movie is releasing in cinemas on 14th October 2022.
https://www.instagram.com/reel/Cje3mmIKk6U/?igshid=YmMyMTA2M2Y=
'तुला इष्काचा डसलाय मुंगळा' आयटम सॉंगवर थिरकणार महाराष्ट्र
'हरिओम' मधील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला 'हरिओम' चित्रपटातील आपल्याला एकापेक्षा एक वेगवेगळ्या धाटणीची गाणी पाहायला मिळत आहेत. 'सुरु झाले पर्व नवे' हे प्रेमगीत, 'उठ गड्या' हे स्फूर्तीदायी गाणे , 'डीजे वाल्या' हे प्रत्येकास थिरकवणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता उडत्या पट्टीचे गाणे 'तुला इष्काचा डसलाय मुंगळा' प्रदर्शित झाले आहे. या झक्कास आयटम सॉंगला शाल्मली खोलगडे, निरंजन पाडगावकर यांचा जबरदस्त आवाज लाभला असून प्रशांत जामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पाडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी शाल्मली खोलगडे तिच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. बोल्ड, ग्लॅमरस असे या गाण्याचे छायांकन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून हरिओम घाडगे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक वृत्तपत्रात असो किंवा सोशल मीडियावर असो 'हरिओम'ची चलती आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे हे प्रमुख भूमिकेत असून ‘हरिओम’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर राज सुरवाडे आहेत. येत्या १४ ऑक्टोबरला 'हरिओम' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘प्लॅनेट मराठी’चे 'प्लॅनेट गोयं' सुपर ॲप गोवेकरांसाठी सज्ज मनोरंजनासोबतच गोव्याची इत्यंभूत माहिती उपलब्ध
पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. नेहमीच प्रेक्षकांना सर्जनशील आशय देत आलेले प्लॅनेट मराठी आता एक नवीन, मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण असा ॲप घेऊन आले आहे. हा ॲप खास गोव्यासाठी बनवण्यात आला आहे. या सुपर ॲपचे नाव 'प्लॅनेट गोयं' असून यात मनोरंजनाबरोबरच व गोव्याची इत्यंभूत माहितीही उपलब्ध होणार आहे. नुकतीच या ॲपची घोषणा करण्यात आली असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते 'प्लॅनेट गोयं' चे अनावरण करण्यात आले. ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) च्या सहयोगाने प्लॅनेट मराठी ही संकल्पना घेऊन आले आहेत. या संकल्पनेचा विचार अक्षय बर्दापूरकर यांचा असून सौम्या विळेकर व गौतम ठक्कर प्रेरणाशक्ती आहेत. संतोष खेर हे प्रायोजक आहेत. आजच्या या दिनाचे औचित्य साधून ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) आणि ‘प्लॅनेट गोयं’मध्ये करारही झाला.
'प्लॅनेट गोयं' केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित नसून यामध्ये ट्रॅव्हल, टुरिझम, फूड, इव्हेंट्स या सगळ्याची माहिती उपलब्ध असणार आहे. हा अॅप गोव्यातील स्थानिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी निश्चितत फायद्याचा ठरेल. 'प्लॅनेट गोयं' हा पहिला कोंकणी अँप असून इंग्रजी, हिंदीतील आशयांबरोबरच कोंकणी भाषेतील मनोरंजनात्मक आशय आणि मराठी भाषेतील डब फिल्म्सही या ॲपवर उपलब्ध असतील.
या ॲपबद्दल गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "प्लॅनेट मराठीतर्फे राबविण्यात आलेला ‘प्लॅनेट गोयं’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मनोरंजनासोबतच गोव्यातील अनेक अनभिज्ञ पर्यटन स्थळांची, गोव्याचा इतिहास, त्याला लाभलेली वैभवशाली परंपरा, मंदिरे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त अस्सल पारंपरिक खाद्यसंस्कृती, आधुनिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद कुठे घेता येईल, या सगळ्याची माहिती ‘प्लॅनेट गोयं’वर मिळणार आहे. त्यामुळे आता गोव्यातील पर्यटन सुखकर होणार आहे. गोव्यात अतिशय गुणी कलाकार आहेत, त्यांना यामुळे उत्तम व्यासपीठ मिळेल. शिवाय यानिमित्ताने गोव्यातील तरूणांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या गोव्यात त्यांनी ही संकल्पना राबवली.’’
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " प्लॅनेट मराठी आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वेगळ्या राज्यात पदार्पण करत आहे. गोवा गव्हर्नमेंट व ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) च्या सह भागीदारीने आम्ही नवीन संकल्पना गोव्यातील स्थानिकांसाठी व पर्यटकांसाठी घेऊन आलो आहोत. गोवा राज्य निवडण्याचे कारण म्हणजे गोव्याला लाभलेली समृद्ध परंपरा, पर्यटन, खाद्यसंस्कृती आणि मुख्य म्हणजे गोव्यात आयोजित होणारा चित्रपट महोत्सव. गोव्यातील लोक हे कलाप्रेमी आहेत. त्यामुळे गोव्यात प्रतिभाशाली कलावंत आहेत. महिन्याला किमान एखादा कोंकणी चित्रपट किंवा वेबसीरिज या ॲपवर आणण्याचा आमचा मानस आहे आणि नव्वद टक्के हे व्यासपीठ गोवेकरांसाठीच असणार आहे. मनोरंजनात्मक आशयबरोबरच गोव्यातील प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती 'प्लॅनेट गोयं'वर मिळणार आहे. गोव्यात जाऊन काही शोधण्यापेक्षा या ॲपवर एकाच ठिकाणी सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. "
'अथांग' वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट...
'प्लॅनेट मराठी ओटीटी' यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरीज 'अथांग'. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलंय. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित 'अथांग'मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांची फौज झळकणार आहे.
'अथांग' चा रंजक व उत्कंठावर्धक टीझर पाहून वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. वेबसिरीजचा टीझर पाहताना 'अथांग' वेब सिरीज हॉरर की थ्रिलर? असा प्रश्न पडतो. एका शापित कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक तरल प्रेमकथाही पाहायला मिळेल.
प्लॅनेट मराठी चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " आतापर्यंत प्लॅनेट मराठीनं अशा प्रकारच्या आशयाची निर्मिती केलेली नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि मागणीनुसार आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती करतो. 'अथांग' ही त्यापैकीच एक आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तेजस्विनी पंडित उत्तम अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण आहे. प्लॅनेट मराठीच्या गाजलेल्या 'अनुराधा' आणि 'रानबाजार' या वेबसीरीजमध्ये तिनं जबरदस्त परफॉर्मंस दिलाय. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक ताकदीची निर्मितीसुद्धा आहे. तिला आशयाची जाण असल्याने ही वेबसिरीज सर्वांचे लक्ष वेधून घेईल." 'अथांग' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.
This season let’s get lost in Love with Ki Kariye from Code Name Tiranga
https://bit.ly/KiKariye-Song
The trailer of one of the espionage-thrillers of the year, Code Name Tiranga received a lot of love from the audience for its high-octane action and emotions. While fans are eagerly waiting for the film the makers have rose their excitement a notch higher by dropping 'Ki Kariye', a soulful rendition that will win over their hearts.
Shoot in a picturesque location in Turkey, Ki Kariye just hits the right chord. It's almost impossible to take your eyes off Harrdy, Parineeti, and their crackling chemistry.
Ki Kariye is sung by Harrdy Sandhu & Sakshi Holkar. While it's composed by Jaidev Kumar penned by Kumaar and Alaap by Sanj V
Speaking about the same, the actor singer Harrdy mentioned, “Ki Kariye is one of the most special songs for me. The audiences have showered me with abundant love for my music, I hope this song and the film also receives the same amount of appreciation. This song will grow on people and I am certain they will hear it on loop like us."
‘Code Name: Tiranga’ is presented by Gulshan Kumar, T-Series, and Reliance Entertainment along with Film Hangar and produced by Bhushan Kumar, Ribhu Dasgupta, Vivek B. Agrawal, and Reliance Entertainment. The film will hit the big screens on 14th October 2022.
यंदाच्या दिवाळीत जगभरात सजणार 'हर हर महादेव'चे तोरण 'हर हर महादेव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शि
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असताना या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाचे टीझर राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आले आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढवली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. यंदा याआधी कधीच न झालेला असा प्रयोग 'हर हर महादेव' या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दिवाळी आणि भारतीय ऐतिहासिक संस्कृती यांचे एक वेगळंच नातं आहे.
अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स'ची असून यात सुबोध भावे, शरद केळकर ,अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला 'हर हर महादेव' सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार यात काही शंकाच नाही.
Nushrratt Bharuccha's next is a drama-thriller titled 'Akelli'.
Nushrratt Bharuccha, who has been raising the bar with her choice of brave subjects for movies, will be seen next in a drama-thriller titled ‘Akelli’.
Set in Iraq, 'Akelli' showcases how a person realizes her own capabilities in adverse situations like being trapped in the desert land.
'Akelli' is helmed by Pranay Meshram, who has worked as an associate director for various projects and will debutant as a director with this film.
Akelli is produced by Dashami Studioz' Nitin Vaidya, Ninad Vaidya, Aparna Padgaonkar along with Vicky Sidana & Shashant Shah.
Speaking about the film, the producer and Founder of Dashami Studioz, Mr. Nitin Vaidya expressed, “We are thrilled to announce Akelli starting Nushrratt Bharuccha. Her character in this film symbolizes a lone woman’s battle against all odds. The film's subject is very different and as a storyteller Pranay has visualized each and every bit so well that his conviction made us want to back this movie.“
“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025” Saaffrons World announces the Beauty & Talent...