Saturday, November 9, 2024

साहेबरावांच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये उडाली खळबळ!

 साहेबरावांच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये उडाली खळबळ!

कलर्स मराठीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिका आता अधिकच रोमांचक होत चालली आहे. गावातील मानाच्या शर्यतीत स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यासाठी साहेबराव पाटील आणि अप्पा धुमाळ समोरासमोर आले आहेत. साहेबराव शर्यतीसाठी सानिकाचं नाव घोषित करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. एकीकडे सरकारचा पारा चढलेला आहे तर दुसरीकडे सानिका या निर्णयामुळे खूप खुश आहे. 

आता या शर्यतीचा निकाल काय असेल?या स्पर्धेमुळे सरकार आणि सानिकामध्ये तणाव निर्माण होईल का? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ‘#लय आवडतेस तू मला’, दररोज रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर!

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

१४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत  १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे.  

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या  सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा 'मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी श्री. पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), श्री. ज्ञानेश महाराव (लेखक  व पत्रकार), श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र),  श्रीगौरी  सुरेश  सावंत (सामाजिक  क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती),  श्री रोहित राऊत  (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत. 

बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश  उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून श्री. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज  श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद  रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), श्री.जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर

पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम  जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

आयएआरसीच्या नुसार २०५० पर्यंत कॅन्सर केसेसचे प्रमाण ३५ मिलियनपर्यंत पोहोचेल

आयएआरसीच्या नुसार २०५० पर्यंत कॅन्सर केसेसचे प्रमाण ३५ मिलियनपर्यंत पोहोचेल

सातवी अपोलो कॅन्सर परिषद २०२४ सुरु

नवी मुंबई, ९ नोव्हेंबर २०२४:  अपोलो कॅन्सर सेंटर, मुंबईने आयोजित केलेल्या अपोलो कॅन्सर परिषदेच्या सातवी आवृत्तीला आजपासून सुरुवात झाली. आघाडीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ४०० हुन जास्त फॅकल्टी, कॅन्सर देखभाल तज्ञ आणि संशोधकांसहित २००० हुन जास्त ऑन्कोलॉजिस्ट यामध्ये भाग घेत आहेत. हा कार्यक्रम कॅन्सर देखभालीमध्ये नवीन प्रगती आणि नावीन्याबाबत, आधुनिक उपचारांपासून अचूक ऑन्कोलॉजीपर्यंत सर्व विकसित क्षेत्रांविषयी चर्चा करण्यावर केंद्रित आहे. नुकतीच ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान सुरु करण्यात आलेली ही परिषद आरोग्य देखभाल क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि संशोधन सादरीकरणामध्ये भाग घेण्यासाठी एक प्रभावी मंच आहे. यामध्ये मुख्य भाषण आणि इतर अनेक सत्रांमध्ये कॅन्सर देखभालीच्या उपचारांविषयी तसेच व्यवस्थापन धोरणांविषयी महत्त्वाची माहिती दिली जाईल. परिषद कॅन्सरच्या विरोधात अधिक प्रभावीपणे आणि सहानुभूतीपूर्वक लढण्यासाठी समर्पित आहे.

डॉ एलिसाबेत वीडरपास, संचालिका, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी सांगितले,"आयएआरसी (IARC) च्या २०२२ च्या अनुमानांवरून समजते की, जगभरात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, २०२२ मध्ये नवीन केसेस २० मिलियन होत्या, त्या २०५० मध्ये वाढून ३५ मिलियनपर्यंत पोहोचतील. भारतामध्ये २०२२ मध्ये कॅन्सरच्या १.४१ मिलियन नवीन केसेस आढळून आल्या होत्या, यामध्ये २०५० पर्यंत २.६९ मिलियनपर्यंत वाढ होईल असे वाटते. हे अनुमान खूपच भयावह आहे, आणि म्हणूनच कॅन्सरची महामारी रोखण्यासाठी महत्त्वाचे हत्यार आहे आजाराला प्रतिबंध घालणे. कॅन्सरला रोखणे काळाची गरज बनली आहे. अपोलो कॅन्सर कॉन्क्लेव २०२४ सारखे उपक्रम तज्ञांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी मंच बनतात. IARC मध्ये आम्ही असे जग निर्माण करू इच्छितो जिथे कॅन्सरच्या केसेस अगदीच नगण्य असतात. त्यासाठी प्रतिबंध, आजार लवकरात लवकर ओळखण्यासाठी सक्रिय आणि पुराव्यावर आधारित धोरणांची आवश्यकता आहे. ही परिषद या धोरणांना सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आणि आमचे सामूहिक मिशन मजबूत करण्याची एक उल्लेखनीय संधी आहे."

श्री दिनेश माधवन, अध्यक्ष,ऑन्कोलॉजी अँड इंटरनॅशनल ग्रुप, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड म्हणाले,"ऑन्कोलॉजी क्षेत्र सातत्याने विकसित होत आहे, जगभरामध्ये होत असलेले अभूतपूर्व नावीन्य सर्वांसमोर आणणे महत्त्वाचे आहे. कॅन्सरचा आजार लवकरात लवकर समजून येण्यात खूप प्रगती होत आहे. आमच्याकडे उत्तम प्रशिक्षण मिळवलेले डॉक्टर आणि अत्याधुनिक तंत्रे आहेत, आम्ही ऑन्कोलॉजीला एक नवे रूप देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कॅन्सर व्यवस्थापन आणि उपचारांमध्ये तंत्रज्ञानातील प्रगती सोबत ताळमेळ राखत अपोलो कॅन्सर सेंटर या परिवर्तनकारी वाटचालीमध्ये सर्वात पुढे आहे, १४७ देशांमध्ये ३.५ बिलियन लोकांची सेवा करत आहे."

डॉ अनिल डीक्रूज, संचालक, ऑन्कोलॉxजी सेवा, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"अपोलो कॅन्सर कॉन्क्लेव जगभरातील ऑन्कोलॉजी समुदायांसाठी एक बहुप्रशिक्षित कार्यक्रम बनला आहे. ही परिषद कॅन्सर देखभालीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काम करत असलेले विचारवंत, डॉक्टर आणि संशोधक यांना एकत्र आणते. ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करणे, सहयोग वाढवणे आणि कॅन्सरवरील उपचारांना प्रेरणा देणे, आव्हान देणे आणि सामूहिक प्रयत्नांतून त्यामध्ये प्रगती घडवून आणणे आमचे उद्दिष्ट आहे. यावर्षी आम्ही अचूक ऑन्कोलॉजीवर लक्ष केंद्रित करत आहेत, ही बाब कॅन्सर उपचारासाठी अधिक अनुकूल, रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाच्या दिशेने परिवर्तन अधोरेखित करते, हे परिवर्तन कॅन्सरच्या विरोधात लढत असलेल्या रुग्णांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणते."

Shael Oswal Unveils “Rabba Kare” Featuring Urvashi Rautela

Shael Oswal Unveils “Rabba Kare” Featuring Urvashi Rautela – A Grand Romantic Anthem Set to Dominate the Season


Full song releasing on the 15th of November

Hold onto your hearts because Shael Oswal is about to sweep you off your feet with his latest teaser drop, Rabba Kare! Set to be the romantic anthem of the season, this track promises nothing less than pure musical magic. A dreamy blend of soulful melody and heartfelt lyrics, Rabba Kare will leave you humming along long after it’s over.

And that’s not all – sharing the spotlight in the music video is the dazzling Urvashi Rautela, bringing her star power and unmatched glam to the screen.

”Every lyric, every note carries the emotions we often struggle to express. Collaborating with Urvashi Rautela has elevated the experience, and I can’t wait to share this journey with everyone. I believe Rabbakare will resonate deeply and become the anthem of hearts this season” says Shael Oswal

Urvashi Rautela says “Rabba Kare is a beautiful, soulful journey of love that strikes a chord with its melody and deep emotions. Collaborating with Shael Oswal has been a truly rewarding experience, as his passion for music shines through every note. I’ve always been a fan of his voice, and his blockbuster track ‘Heeriye’ has been a favorite on my playlist for a long time. Now, being a part of this song with him is not just special but a proud moment for me. I believe ‘Rabba’ will resonate with everyone who has ever experienced love in its purest form"

Caption- @itsshaeloswal & @urvashirautela bring romance to life in the mesmerizing teaser of '#RabbaKare. Full song releasing on the  15th of November, 2024.

#shaeloswal #urvashirautel #rabbakare #Teaser

[Teaser, Rabba Kare, Shael Oswal, Urvashi Rautela, Romantic Song, Romantic Vibes, Music, New Song, Romance]

Bollywood Celebs Light Up a Star-Studded Diwali Bash Hosted by Parul Chawla and Vicky Hamid at Club Illusions

Bollywood Celebs Light Up a Star-Studded Diwali Bash Hosted by Parul Chawla and Vicky Hamid at Club Illusions

It was a total vibe last night as the crème de la crème of Bollywood, TV, fashion, and the OTT world gathered for a Diwali bash that was nothing short of lit. The who’s who of the industry including Rajiv Thakur, Archana Gautam, Aoora,  Rohit K. Verma, Shweta Khanduri, Shibani Kashyap,  Prashant Virendra Sharma came dressed to impress, adding a dazzling touch to the already shimmering night filled with lights, laughter, and mad energy.

The ambience was a mix of tradition and trendiness, decked up with fairy lights and aesthetic Diwali decor that screamed Insta-worthy. The DJ spun out sick beats, setting the dance floor on fire while guests indulged in some mouthwatering Diwali delicacies. 

”It was a lovely night of light, love, and laughter, bringing together family and friends. It was pure magic seeing everyone shine, dressed in their festive best and spreading joy all around” says Parul Chawla and Vicky Hamid
Caption- Last night was a total vibe as Bollywood, TV, fashion, and OTT royalty lit up our Diwali bash with all the glitz and glam hosted by @parulchawla9 and @vickyhamid at @clubillusions.andheri The bash saw the presence of Rajiv Thakur, Archana Gautam, Aoora,  Rohit K. Verma, Shweta Khanduri, Shibani Kashyap,  Prashant Virendra Sharma. 

@rajivthakur007
@archanagautamm
@aoora69
@rohitkverma
@shweeaakhanduriofficial
@shibanikashyap
@prashantvirendrasharma
@parulchawla9
@picturenkraft

Friday, November 8, 2024

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवीन सीझनच्या शुटिंगला सुरुवात. प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवीन सीझनच्या शुटिंगला सुरुवातप्राजक्ता माळीने  शेअर केला व्हिडीओ.

 


सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहेया कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलंपरंतु गेल्या काही महिन्यांपासून ह्या शोने ब्रेक घेतला होतात्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होतेयाच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होतात्यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी झालेशिवाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहेमागील काही पर्व प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहेदरम्यानसोशल मीडियावर प्राजक्ताने हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहेया व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहेअभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहेअसं म्हणत व्हिडीओमधून तिने नव्या सीझनच्या शुटिंगला सुरूवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहेया व्हिडीओमध्ये हास्यजत्रेतील कलाकार तसेच शोमध्ये असणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हनकर दिसत आहेतयेत्या  डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रापुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेअसं म्हणत तिने हा व्हिडीओ शूट केल्याचा पाहायला मिळतोयआता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहेप्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खुश झाले असून सर्वजण या नव्या सिझनसाठी आतुर आहेत.'महाराष्ट्राची हास्यजत्राकॉमेडीची हॅटट्रिक!”  डिसेंबरपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहेसोमवार ते बुधवार रात्री :३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Varun Dhawan's action avatar in Citadel impresses netizens

Varun Dhawan's action avatar in Citadel impresses netizens

Varun Dhawan, known for his charming roles, has recently showcased a different side of his acting prowess in the action-packed series, Citadel Honey Bunny. The series, directed by Raj & DK, has garnered praise for its thrilling storyline and impressive performances.

Dhawan's portrayal of a special agent has particularly caught the attention of viewers, who are lauding his ability to deliver high-octane action sequences with effortless ease. 

Ever since the series dropped yesterday, social media has been abuzz with positive reactions to Dhawan's performance. While a user mentioned, “Varun Dhawan in action is my favourite genre”, another one posted, “Varun Action Dhawan is just fire!” 

Varun Dhawan's action-packed avatar has definitely been well-received by the audience and his performance. As Citadel might mark a new era in his career, Varun will be next seen in Baby John in a full massy avatar which releases this Christmas on the big screen.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...