Saturday, November 9, 2024

आयएआरसीच्या नुसार २०५० पर्यंत कॅन्सर केसेसचे प्रमाण ३५ मिलियनपर्यंत पोहोचेल

आयएआरसीच्या नुसार २०५० पर्यंत कॅन्सर केसेसचे प्रमाण ३५ मिलियनपर्यंत पोहोचेल

सातवी अपोलो कॅन्सर परिषद २०२४ सुरु

नवी मुंबई, ९ नोव्हेंबर २०२४:  अपोलो कॅन्सर सेंटर, मुंबईने आयोजित केलेल्या अपोलो कॅन्सर परिषदेच्या सातवी आवृत्तीला आजपासून सुरुवात झाली. आघाडीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ४०० हुन जास्त फॅकल्टी, कॅन्सर देखभाल तज्ञ आणि संशोधकांसहित २००० हुन जास्त ऑन्कोलॉजिस्ट यामध्ये भाग घेत आहेत. हा कार्यक्रम कॅन्सर देखभालीमध्ये नवीन प्रगती आणि नावीन्याबाबत, आधुनिक उपचारांपासून अचूक ऑन्कोलॉजीपर्यंत सर्व विकसित क्षेत्रांविषयी चर्चा करण्यावर केंद्रित आहे. नुकतीच ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान सुरु करण्यात आलेली ही परिषद आरोग्य देखभाल क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि संशोधन सादरीकरणामध्ये भाग घेण्यासाठी एक प्रभावी मंच आहे. यामध्ये मुख्य भाषण आणि इतर अनेक सत्रांमध्ये कॅन्सर देखभालीच्या उपचारांविषयी तसेच व्यवस्थापन धोरणांविषयी महत्त्वाची माहिती दिली जाईल. परिषद कॅन्सरच्या विरोधात अधिक प्रभावीपणे आणि सहानुभूतीपूर्वक लढण्यासाठी समर्पित आहे.

डॉ एलिसाबेत वीडरपास, संचालिका, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी सांगितले,"आयएआरसी (IARC) च्या २०२२ च्या अनुमानांवरून समजते की, जगभरात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, २०२२ मध्ये नवीन केसेस २० मिलियन होत्या, त्या २०५० मध्ये वाढून ३५ मिलियनपर्यंत पोहोचतील. भारतामध्ये २०२२ मध्ये कॅन्सरच्या १.४१ मिलियन नवीन केसेस आढळून आल्या होत्या, यामध्ये २०५० पर्यंत २.६९ मिलियनपर्यंत वाढ होईल असे वाटते. हे अनुमान खूपच भयावह आहे, आणि म्हणूनच कॅन्सरची महामारी रोखण्यासाठी महत्त्वाचे हत्यार आहे आजाराला प्रतिबंध घालणे. कॅन्सरला रोखणे काळाची गरज बनली आहे. अपोलो कॅन्सर कॉन्क्लेव २०२४ सारखे उपक्रम तज्ञांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी मंच बनतात. IARC मध्ये आम्ही असे जग निर्माण करू इच्छितो जिथे कॅन्सरच्या केसेस अगदीच नगण्य असतात. त्यासाठी प्रतिबंध, आजार लवकरात लवकर ओळखण्यासाठी सक्रिय आणि पुराव्यावर आधारित धोरणांची आवश्यकता आहे. ही परिषद या धोरणांना सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आणि आमचे सामूहिक मिशन मजबूत करण्याची एक उल्लेखनीय संधी आहे."

श्री दिनेश माधवन, अध्यक्ष,ऑन्कोलॉजी अँड इंटरनॅशनल ग्रुप, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड म्हणाले,"ऑन्कोलॉजी क्षेत्र सातत्याने विकसित होत आहे, जगभरामध्ये होत असलेले अभूतपूर्व नावीन्य सर्वांसमोर आणणे महत्त्वाचे आहे. कॅन्सरचा आजार लवकरात लवकर समजून येण्यात खूप प्रगती होत आहे. आमच्याकडे उत्तम प्रशिक्षण मिळवलेले डॉक्टर आणि अत्याधुनिक तंत्रे आहेत, आम्ही ऑन्कोलॉजीला एक नवे रूप देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कॅन्सर व्यवस्थापन आणि उपचारांमध्ये तंत्रज्ञानातील प्रगती सोबत ताळमेळ राखत अपोलो कॅन्सर सेंटर या परिवर्तनकारी वाटचालीमध्ये सर्वात पुढे आहे, १४७ देशांमध्ये ३.५ बिलियन लोकांची सेवा करत आहे."

डॉ अनिल डीक्रूज, संचालक, ऑन्कोलॉxजी सेवा, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"अपोलो कॅन्सर कॉन्क्लेव जगभरातील ऑन्कोलॉजी समुदायांसाठी एक बहुप्रशिक्षित कार्यक्रम बनला आहे. ही परिषद कॅन्सर देखभालीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काम करत असलेले विचारवंत, डॉक्टर आणि संशोधक यांना एकत्र आणते. ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करणे, सहयोग वाढवणे आणि कॅन्सरवरील उपचारांना प्रेरणा देणे, आव्हान देणे आणि सामूहिक प्रयत्नांतून त्यामध्ये प्रगती घडवून आणणे आमचे उद्दिष्ट आहे. यावर्षी आम्ही अचूक ऑन्कोलॉजीवर लक्ष केंद्रित करत आहेत, ही बाब कॅन्सर उपचारासाठी अधिक अनुकूल, रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाच्या दिशेने परिवर्तन अधोरेखित करते, हे परिवर्तन कॅन्सरच्या विरोधात लढत असलेल्या रुग्णांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणते."

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...