Thursday, November 7, 2024

‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

 ‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या  वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत  त्यांनी लेखक आणि  दिगदर्शक  म्हणूनही  मनोरंजनसृष्टीवर  स्वतंत्र  ठसा  उमटवला आहे.  सध्या  मात्र एका  वेगळ्याच  कारणाने  ते  प्रसिद्धीच्या  झोतात आलेले आहेत.  गोल्डमॅन  म्हणून सध्या ते  सगळीकडे वावरतायेत.  त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे  त्यांना ही आवड कधी निर्माण  झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’  या चित्रपटातील ‘बबन’  ही  व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी  साकारत असून या  बबनला अंगावर दागिने घालून  मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.    

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ऋषिकेश जोशी सांगतात, अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा ‘बबन’  हे एक  मजेशीर  पात्र आहे.  बबनच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि  घड्याळ  असते. मला स्वतःला ही भूमिका  करताना मजा आली. त्यामुळे प्रेक्षकही ही  भूमिका  एन्जॉय करतील असा विश्वास  ते व्यक्त  करतात.  या चित्रपटात  ऋषिकेश जोशी, यांच्यासोबत विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते आदि कलाकार आहेत.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत. 

मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...