Wednesday, November 13, 2024

महिलांच्या आत्मशोधाचं गाणं, ‘गुलाबी’मधील ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला..

 महिलांच्या आत्मशोधाचं गाणं, ‘गुलाबी’मधील ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला.. 

‘गुलाबी’ चित्रपटातील आणखी एक प्रेरणादायी गाणं ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महिलांच्या स्वत्वाचा शोध आणि आयुष्याकडे पाहाण्याच्या नवीन दृष्टिकोनाबद्दल हे गाणं आहे. महिलांनी आपल्या जीवनात केलेल्या अनेक तडजोडी, त्यातून हरवलेलं अस्तित्व, आणि शेवटी स्वतःसाठी उभं राहाण्याची ताकद या गाण्यातून मांडली गेली आहे.

अदिती द्रविड यांचे गीत असलेल्या या गाण्याला साई-पियुष यांच्या संगीताने सजवलं आहे, तसेच आर्या आंबेकरचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. हे गाणं प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात स्वतःला शोधण्याची प्रेरणा देणारं आहे. या गाण्यातून स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष आणि नव्या सुरुवातीचा एक सुंदर प्रवास उलगडतो.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘‘स्त्री ही कायमच दुसऱ्यांसाठी जगत आलेली आहे. कधी कधी ती स्वतःला इतकं विसरते की स्वतःचा शोध घेण्याची वेळ येते. ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ हे गाणं अशा प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी काही करण्याची प्रेरणा देणारं आहे.”

व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे आहेत. तर अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...