Saturday, November 16, 2024

पोलिसांच्या कार्याला सलाम करणारा 'कवच'

 पोलिसांच्या कार्याला सलाम करणारा 'कवच'

प्रजासत्ताकात  कायदा आणि सुशासन यांचे अनन्यसाधारण  महत्त्व असते आणि या व्यवस्थेतील  महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलिस प्रशासन. सार्वजनिक जीवनात सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते आणि ते पोलिस यंत्रणा अत्यंत  कार्यक्षमपणे पार पाडीत असते. सर्वसामान्यांना  त्रास  होऊ  नये यासाठी  त्यांचे 'कवच'  बनून हे  पोलिस बांधव  दिवसरात्र कार्यरत असतात.  त्यांच्या कार्याला, समर्पणाला, त्यागाला  सलाम करणारा ‘कवच’ हा मराठी चित्रपट  येऊ घातला आहे. 

नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या पोलिसांच्या कार्याची महती आगामी ‘कवच' या  मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर लेखक -दिग्दर्शक घनशाम येडे मांडणार आहेत.‘फौजी’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘कवच’ या चित्रपटातून ते पोलिसांच आयुष्य व त्यांचे कार्य आपल्यासमोर मांडणार आहेत. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘कवच' या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 

समाजाला पोलिसांचं ‘कवच’ नसतं तर समाजात अराजकता माजली असती...

माणूस माणसात राहिला नसता, जात, धर्म,पंत संस्कृतीची विल्हेवाट लागली असती...

तुमची कोणतीच गोष्ट तुमची राहिली नसती…

तुमचं अस्तित्व,इमानदारी स्वाभिमानाचं तर सोडा तुमचं जगणं असह्य झालं असतं…

लोकशाहीची हुकूमशाही झाली असती....

असे धारदार सवांद प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ऐकायला मिळतायेत. आपल्यासाठी कर्तव्यतत्पर असणाऱ्या पोलिसांच्या याच कार्याला ‘कवच’ या चित्रपटातून मानवंदना देण्यात येणार आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्याआणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास घनशाम येडे यांनी  केला आहे. ‘बोला अलख निरंजन’, ‘फौजी’अशा वेगळ्या धाटणीच्या विषयांना त्यांचा दिग्दर्शकीय स्पर्श लाभला आहे. पोलिसांप्रती आपली  कृतज्ञता  व्यक्त करण्यासाठी  या चित्रपटाची निर्मिती केल्याचे घनशाम येडे सांगतात.

 या वर्षाअखेरीस ‘कवच’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...