Friday, November 15, 2024

श्रीवर पुन्हा कोसळला संकटाचा डोंगर, शुभ्राचा कट यशस्वी

 श्रीवर पुन्हा कोसळला संकटाचा डोंगर, शुभ्राचा कट यशस्वी

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ मध्ये आणखी एक रोमांचक वळण आले आहे. श्रीने आपल्या कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी शुभ्राच्या खोट्या खेळींचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला असतानाच, शुभ्राचे कारस्थान अजूनही सुरुच आहे.

शुभ्राने विशालला पैसे देऊन अगस्त्य आणि श्रीला मारण्याचा कट आखल्याचे विशूला समजले होते आणि त्याने श्रीला याबाबत सांगण्यासाठी भेटायला बोलावले होते. मात्र, शुभ्राने आपल्या चतुराईने, विशूवर हल्ला करण्याचा कट रचला. या हल्ल्याचा संशय आता श्रीवर आला असून, श्रीला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

शुभ्राच्या या नवीन योजनेमुळे श्रीची अवस्था अजूनच बिकट झाली आहे. श्रीवर आलेल्या या नव्या संकटामुळे ती कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवू शकणार का? श्री अखेर शुभ्राला हरवू शकेल का? हे पाहाण्यासाठी नक्की बघा ‘अबीर गुलाल’ आज रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...