Tuesday, November 12, 2024

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

 11th November, 2024 (“Execution Date”)

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Subject: No Objection (“NOC”) to broadcast our Sound Recordings on FM radio channels owned and operated by

the Counter-party (defined hereinafter).

Dear Sir/ Madam,

1. We, Tips Music Limited (hereinafter referred to as “TML”) hereby declare that we are the copyright owners of the Sound Recordings, as more particularly described in Annexure A below. Pursuant to a promotional campaign being run by TML, the Counter-Party intends to broadcast our a forementioned Sound Recordings on their FM radio channel(s), owned, operated and controlled solely by the Counter-party (“Channel(s)”).

2. We state that we have no objection to the Counter-Party broadcasting the aforementioned Sound Recordings and/or part thereof along with the underlying literary and musical works (“Underlying Works”) therein, throughout the Term and Territory as specified in Annexure A, and for such broadcast the Counter-Party shall not be required to make any payment of consideration to TML. In furtherance to the aforesaid, TML hereby grants to the Counter-party a non-exclusive, non-transferable, no objection to broadcast the Sound Recording along with the Underlying Works contained therein on an as-is basis on the Channels during the Term and in the Territory. TML and the Counter-party however hereby agrees that royalties shall become payable as per applicable laws for the use of the Sound Recordings and the Underlying Works in the Channels.

3. The Counter-party hereby agrees and undertakes that the use of the Sound Recordings along with the Underlying Works shall be on a non-commercial basis; and the Counter-party shall, at all times, ensure that such usage is in compliance with all applicable laws of the Territory. Notwithstanding anything contrary contained herein, the Counter-party undertakes and agrees that it shall solely be responsible to procure all requisite licenses/permissions from the copyright societies and/or collection organizations and for payment of all statutory royalties in accordance with applicable laws, without any recourse to TML, for the use of the Sound Recordings and Underlying Works as per the terms hereof.

4. This NOC does not confer any rights, title or ownership in the Sound Recordings, Underlying Works and/or any part thereof in favour of the Counter-party, and all intellectual property rights in and to the Sound Recordings and Underlying Works shall continue to be owned solely and exclusively by TML in perpetuity. The no objecti granted herein is subject to the Counter-party not exploiting the Sound Recordings (or any part of the song and/or the Underlying Works and performances) on a stand-alone basis independent of the Channel or in any manner not expressly authorized herein, and to the Counter-party undertaking to not upload/make available any part of the songs and/or Sound Recordings on any other platforms, social media platform, applications, etc. save and except the Channel for the sole purpose as permitted herein.

5. The Counter-party herein agrees to indemnify and hold harmless TML and its respective directors, offices and employees (to the extent of all benefits and awards, cost of litigation, disbursements and reasonable attorney's fees that may be incurred in connection therewith) from any third party claim which may arises due to a breach of any term of this NOC by the Counter-party during the Term and in the Territory.

6. This NOC and the content thereof is without prejudice to TML and their rights, remedies, contentions and positions in various pending/Sub-judice matters viz suits, appeals and/or other court proceedings, instituted by them or against them, in connection / with respect to broadcast of Sound Recordings on FM radio stations or any proceedings that that may be instituted in future by TML, or any third party.

7. The terms of this NOC shall be confidential, and the Counter-party shall not be entitled to disclose the terms herein to any third party during the NOC Term and for a period of 12 months thereafter. In the event the Counter- party is required by law to disclose the NOC, it shall require prior written consent of TML, which consent shall not be unreasonably withheld.

8. All disputes and differences howsoever arising out of or in connection with this NOC shall be governed and construed in accordance with the laws of India and shall be subject to the exclusive jurisdiction of the courts in Mumbai. This NOC may be executed by hand or by electronic signature (including digital signatures) by TML and the Counter-party, which shall be considered as an original signature for all purposes and shall be binding.

Yo Yo Honey Singh Hosts Exclusive Dinner for Jason Derulo in Dubai

Yo Yo Honey Singh Hosts Exclusive Dinner for Jason Derulo in Dubai – Is a Power Collab on the Horizon?

The global stage just got a whole lot spicier as India’s music maverick Yo Yo Honey Singh hosted an exclusive dinner for American pop sensation Jason Derulo in the glittering city of Dubai. Both icons, known for setting music charts ablaze, were spotted deep in conversation, sparking speculation among fans and industry insiders alike. Could this mean a cross-continental musical fusion is brewing?

With Derulo’s slick moves and chart-topping hits and Honey Singh’s signature beats and desi swag, the possibilities are endless. For now, the duo left fans with just enough mystery to keep imaginations running wild.

Caption- @yoyohoneysingh and @jasonderulo share an exclusive dinner in Dubai, leaving fans buzzing – is a massive collab on the way? 

Monday, November 11, 2024

A soul as beautiful as her music!

A soul as beautiful as her music!  #PalakMuchhal is recognized with the Mother Teresa Memorial Award, shining a light on her inspiring journey of giving back to society.



बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

 बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड  मराठी सिनेसृष्टीत रानटी  धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी  काही जणांना रानटी व्हावे लागते. आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… असाच रानटीपणा घेऊन  या दशकातील  सर्वात मोठा 'अँग्री यंग मॅन' दिग्दर्शक समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात. 

आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, मराठीत अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता.  मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश  करण्यासाठी विष्णु येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलर मध्ये पहायला मिळतोय. पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं 'अँग्री यंग मॅन' रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे. 

अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे. प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव  देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे. 

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

२२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

संजू राठोडने रचला इतिहास मिळाला सनबर्न एरेना, अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान.

संजू राठोडने रचला इतिहास मिळाला सनबर्न एरेना, अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान.

‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; पहिला मराठी गायक ज्याला मिळाला सनबर्न एरेना, अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान.

गेल्या काही वर्षांत मराठी संगीत क्षेत्राने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली आहे, ज्यात अनेक प्रतिभावान कलाकारांचा मोठा वाटा आहे. असाच एक टॅलेंटेड गायक संजू राठोड. संजूच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘नऊवारी’ गाण्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मराठी संगीतक्षेत्रात त्याने एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे. संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारासमवेत शो सुरू करणारा पहिला मराठी कलाकार ठरला असून, या खास क्षणामुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

म्युझिक कॉन्सर्ट मध्ये, संजूने आपल्या सुपरहिट 'गुलाबी साडी' गाण्याने  प्रेक्षकांना भारावून सोडलं.  'गुलाबी साडी' गाणं ५० मिलिअनपेक्षा अधिक वेळा Spotify वर सर्वाधिक ऐकलं गेलेलं मराठी गाणं आहे. त्यानंतर त्याचं नुकतंच रिलिझ झालेलं 'काळी बिंदी' गाणं देखील सादर केलं, जे सध्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड होत असून युट्युबच्या इंडिया टॉप म्युझिक व्हिडिओ चार्टवर दिसत आहे. त्याच्या जोशपूर्ण परफॉर्मन्सने संपूर्ण प्रेक्षकांना उत्साहाने भारावून सोडलं. पारंपरिक महाराष्ट्रीय संगीताची खासियत आणि त्यात आधुनिक शैलीने गाणं तयार करण्याच्या त्याच्या या अनोख्या कौशल्यामुळे आतंरराष्ट्रीय डीजे स्टेजवर त्याची झालेली निवड ही योग्य होती.

अ‍ॅलन वॉकरच्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक साऊंडसोबत आपल्या महाराष्ट्राची समृद्ध संगीत कला सादर करण्यात आल्यामुळे इतर प्रादेशिक कलाकारांना नक्कीच एक नवी उमेद मिळाली असणार, हे नक्की.  

या संधीविषयी व्यक्त होताना संजू राठोड म्हणाला की, “अ‍ॅलन वॉकरसारख्या ग्लोबल आयकॉनसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती आणि मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्याची ही एक मोठी संधी होती.” चाहत्यांनी देखील कॉन्सर्टविषयी उत्साह व्यक्त केला आणि मनापासून आनंद घेतला.

"भारत आणि दक्षिण आशियामधील Believe कंपनीच्या आर्टिस्ट सर्विसेसच्या डायरेक्टर शिल्पा शारदा यांनी म्हटले की, “संजू राठोडसोबतचे हे कोलॅबोरेशन खूप प्रेरणादायी आहे. संजू हा सनबर्न एरिना मंचावर परफॉर्म करणारा पहिला मराठी कलाकार आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. टॅलेंटेड संजूची अप्रतिम गाणी केवळ प्रादेशिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुध्दा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे, 'गुलाबी साडी' हे त्यापैकी एक गाणं.”

संजू राठोडचे परफॉर्मन्स आणि गाण्यांचा आनंद घेण्यासाठी सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्संना भेट द्या. त्याच्या आगामी गाण्यांच्या अपडेटसाठी त्याला सोशल मीडियावर फॉलो करा.
Instagram - https://www.instagram.com/sanjurathod07/

Saturday, November 9, 2024

साहेबरावांच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये उडाली खळबळ!

 साहेबरावांच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये उडाली खळबळ!

कलर्स मराठीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिका आता अधिकच रोमांचक होत चालली आहे. गावातील मानाच्या शर्यतीत स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यासाठी साहेबराव पाटील आणि अप्पा धुमाळ समोरासमोर आले आहेत. साहेबराव शर्यतीसाठी सानिकाचं नाव घोषित करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. एकीकडे सरकारचा पारा चढलेला आहे तर दुसरीकडे सानिका या निर्णयामुळे खूप खुश आहे. 

आता या शर्यतीचा निकाल काय असेल?या स्पर्धेमुळे सरकार आणि सानिकामध्ये तणाव निर्माण होईल का? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ‘#लय आवडतेस तू मला’, दररोज रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर!

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

१४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत  १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे.  

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या  सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा 'मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी श्री. पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), श्री. ज्ञानेश महाराव (लेखक  व पत्रकार), श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र),  श्रीगौरी  सुरेश  सावंत (सामाजिक  क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती),  श्री रोहित राऊत  (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत. 

बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश  उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून श्री. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज  श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद  रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), श्री.जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर

पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम  जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...