Saturday, February 14, 2026

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित


शतक - संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या प्रभावी आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे चित्रपटाची पहिलीच झलक अतिशय प्रभावी ठरत आहे. यावरून चित्रपटाची भव्यता, भावना आणि गंभीरता यांचा अंदाज येतो.

त्याग, चिकाटी आणि राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारलेला हा ट्रेलर गुरुजी मा. स. गोळवलकर यांच्या संघाच्या चिरंतन विचारांवर आधारित शतकीय प्रवासाचा मागोवा घेतो. विविध दस्तऐवजीकरणावर आधारलेला हा चित्रपट इतिहासातील काही न सांगितलेल्या अध्यायांकडे एका दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतो. भगव्या रंगाच्या प्रभावी प्रतीकातून ही संकल्पना अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचा भाग असल्याबद्दल अजय देवगण म्हणाले, ‘’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.’’

पॅनोरमा यांच्या सहयोगाने निर्मित या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन आशिष मल्ल यांचे आहे. सह-निर्माते आशिष तिवारी आहेत. ‘शतक’ २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.





*महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची दमदार घोडदौड*

 *महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची दमदार घोडदौड*

                            ‘महाविकास २०२६’मध्ये सरकार–                        उद्योग–ग्राहक यांचा संवाद; २,८७९ कोटींची.                   उलाढाल, राज्य आघाडीव

*मुंबई:* देशातील थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, तब्बल २,८७९ कोटी रुपयांच्या उलाढालीसह राज्य देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईतील 'वाय. बी. चव्हाण' सेंटर येथे शुक्रवारी आयोजित 'महाविकास २०२६' या विशेष परिषदेत राज्याच्या या दैदीप्यमान प्रगतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन' (आयडीएसए) आणि महाराष्ट्र शासनाचा 'अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत शासकीय अधिकारी, ग्राहक आयोगाचे सदस्य, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि 'माविम'च्या बचत गटांमधील महिला उद्योजिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणणे, ग्राहकांचे हक्क जोपासणे आणि महिलांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. आयडीएसएच्या आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार, देशातील थेट विक्री उद्योगाने २२,१४२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०४ टक्के वाढ झाली असून, देशभरात ८८ लाखांहून अधिक थेट विक्रेते या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ३९ लाख महिला आहेत.

महाराष्ट्र या वाढीचा सर्वात मोठा घटक ठरला आहे. राज्यात २,८७९ कोटी रुपयांची उलाढाल नोंदली गेली असून, राष्ट्रीय बाजारपेठेत १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. राज्यात १० लाखांहून अधिक सक्रिय थेट विक्रेते उपजीविका करत आहेत. त्यामुळे उद्योगवाढ आणि जबाबदार व्यावसायिकता या दोन्ही बाबतींत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले.

 परिषदेत नियामक चौकट, तक्रार निवारण यंत्रणा आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींवर सखोल चर्चा झाली. ‘स्मार्ट ग्राहक, मजबूत बाजारपेठ’या सत्रात थेट विक्री प्लॅटफॉर्मची पडताळणी कशी करावी, ग्राहक हक्क काय आहेत आणि संरक्षणाच्या उपाययोजना कोणत्या, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

या सत्रात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा आणि ग्राहक वकील संघटनेचे सदस्य अॅड. उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शक विचार मांडले. कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुखांनीही आपले विचार मांडले. मोदीकेअरच्या सीओओ सोमा मैत्रा, अ‍ॅटॉमी इंडियाचे सीईओ/एमडी डॉ. अब्राहम ली, आयडीएसएचे अध्यक्ष डॉ. रत्नेश लाल आणि खजिनदार विवेक काटोच यांनी उद्योगातील पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर दिला. ‘महिलांना उद्योजकतेतून सक्षम बनवणे’ या सत्रात महिला थेट विक्रेत्या आणि ‘माविम’ स्वयंसहाय्यता गटांच्या यशकथा मांडण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागांतून शाश्वत उपजीविका उभारणाऱ्या महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला.

*अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले,* “नियम केवळ कागदावर न राहता प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच त्यांचा परिणाम दिसतो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव असावी आणि कंपन्यांनी उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. या संतुलनातूनच सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बाजारपेठ निर्माण होते.” *आयडीएसएच्या उपाध्यक्षा अपराजिता सरकार यांनी सांगितले,* “वाढ केवळ प्रमाणावर नव्हे, तर विश्वासावर मोजली जाते. पारदर्शक आणि न्याय्य पर्यावरण महिलांना आत्मविश्वास देते, उद्योजकतेला चालना देते आणि शाश्वत उत्पन्नाचे मार्ग खुले करते.”

‘महाविकास २०२६’चा समारोप ग्राहक जागरूकता, नैतिक आचारसंहिता आणि महिलांच्या उद्योजकतेला बळकटी देण्याच्या संयुक्त वचनबद्धतेने झाला. महाराष्ट्रातील थेट विक्री क्षेत्राचे भवितव्य विश्वास आणि पारदर्शकतेवर उभे राहील, असा स्पष्ट संदेश या परिषदेतून देण्यात आला.

Thursday, February 12, 2026

Bonfiglioli Transmissions Limited files DRHP with SEBI for an IPO

Bonfiglioli Transmissions Limited files DRHP with SEBI for an IPO

Bonfiglioli Transmissions Limited, one of India’s largest technology-led mechanical and electro-mechanical power transmissions and industrial drive solutions providers has filed its Draft Red Herring Prospectus (DRHP) with SEBI for an Initial Public Offering (IPO).

Sonia Bonfiglioli, Luciano Bonfiglioli, Luisa Lusardi, BON-FI S.r.l., and Bonfiglioli S.p.A are the promoters of the company.

The offer comprises an Offer for Sale aggregating up to 46,998,958 Equity Shares by Bonfiglioli S.p.A (Promoter Selling Shareholder). The face value of each equity share is ₹10.

Bonfiglioli Transmissions Limited is a part of Bonfiglioli S.p.A headquartered in Italy, and according to the F&S Report, is one of the largest technologically advanced players globally in the mechanical and electro-mechanical power transmissions and industrial drive solutions industry with a revenue of Euro 1,190.9 million (₹105.91 billion) for the year ended December 31, 2024.

The company manufactures a wide range of mission-critical and highly precision engineered gearboxes and drive systems used across diverse end-user markets (Source: F&S Report). Their legacy and reputation lie in the Bonfiglioli brand, which has a worldwide presence of nearly 70 years, and which has established in India through more than 25 years of operations. 

The company broadly caters to three business verticals: Industry and Automation Solutions, Off-Highway Mobility and Wind Industries, based on the end-use applications.

Bonfiglioli Transmissions Limited is the largest manufacturer of gearboxes and drives for original equipment manufacturers (“OEMs”) and end-users engaged in Industry & Automation Solutions (gear motors < 15 kNm), Off-Highway Mobility and Wind Industries in India as of September 30, 2025, in terms of revenue from operations, according to the F&S Report. The company is also among the largest manufacturers of planetary gearboxes in India in Fiscal 2024 by revenue. (Source: F&S Report).

The company’s revenue from operations stood at ₹14,601.74 million for the nine months ended September 30, 2025, and ₹18,640.79 million for the year ended December 31, 2024, while profit after tax was ₹1,651.89 million and ₹1,946.89 million, respectively.

The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the stock exchanges being the BSE Limited (“BSE”) and the National Stock Exchange of India Limited (“NSE”, and together with the BSE, the “Stock Exchanges”).

Axis Capital Limited, BNP Paribas, ICICI Securities Limited and Jefferies India Private Limited are the Book Running Lead Managers to the issue.

DRHP Link: https://www.axiscapital.co.in/contents/Bonfiglioli%20Transmissions%20Limited-DRHP-1770695579.pdf 

रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

 रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत फिरणारी ‘असंभव’ची कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्ये यांचा शोध घेते. एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतसं पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये आणि दडलेली भीती उलगडत जातात, ज्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

थरारासोबतच नात्यांतील संघर्ष, विश्वास, अपराधभाव आणि स्वीकार यांसारख्या भावनिक पैलूंना चित्रपटात प्रभावीपणे हात घालण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि वातावरणनिर्मिती यामुळे चित्रपटाची गूढता अधिक ठळकपणे समोर येते.

चित्रपटाचे दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात, ''थिएटरनंतर आता ॲमेझॉन प्राईममुळे ‘असंभव’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद आहे. घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकरित्या जोडले जातील, याची मला खात्री आहे.”

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, '' 'असंभव' ही भावना आणि नात्यांची गोष्ट आहे. थिएटरनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲमेझॉन प्राईमसारख्या व्यासपीठावर मराठी चित्रपट प्रदर्शित होणं, ही अभिमानाची बाब आहे.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे चार गुणी कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकले आहेत. मुंबई - पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.

*मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर !*

 *मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर !*

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील ‘भाऊ तिर्री तिर्री’ या मजेशीर आणि भन्नाट ट्यूनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्यूनवर उलगडणारे प्रसंग, पात्रांमधील नोकझोक आणि एकामागोमाग येणाऱ्या गंमतीशीर घटनांमुळे संपूर्ण चित्रपटात हलकाफुलका, एंटरटेनिंग माहोल तयार होतो. विशेषतः बाबा खत्रीच्या एंट्रीनंतर घडणाऱ्या विनोदी सीनमुळे कथेला वेगळाच ट्विस्ट मिळणार आहे. 

संजय नार्वेकर या चित्रपटात पाहुणे कलाकार असून यांच्या येण्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कॉमेडीचा डोस अधिकच वाढणार असून, ‘तिर्री तिर्री’च्या धमाल तालावर प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याची पूर्ण तयारी या चित्रपटाने केली आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेला हा चित्रपट चित्रपटगृहात कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट एंटरटेनर ठरणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

Servier deepens commitment in India by establishing a platform dedicated to Single Pill Combinations in Cardiometabolism and Venous Diseases*

 Servier deepens commitment in India by establishing a platform dedicated to Single Pill Combinations in Cardiometabolism and Venous Diseases*

A model of Indo–French collaboration to deliver high-quality therapies

Investing around €15 million euro in 2026 to set up a platform and work with Indian partners to develop top quality Single Pill Combinations (SPCs) to be exported from India to several countries where the unmet need of patient adherence is high. 

*Mumbai, February 11, 2026:* Servier, the independent French pharmaceutical group governed by a foundation, has announced the establishment of a global platform in India - *‘GATINN’* - to work with partners to develop, manufacture and export *Single Pill Combinations (SPCs)*  for cardiometabolic and venous diseases. The platform aims to improve adherence and enable better long-term outcomes for patients globally by simplifying treatment regimens through SPCs. The initiative reflects Servier’s 2030 ambition to accelerate innovation and deliver patient-centric solutions, particularly in chronic conditions where treatment adherence remains a critical challenge. 

*Elaborating on this, Dr. Kshitij Panse, Chief Operating Officer - GATINN, said,* “GATINN embodies Servier’s strategy to address critical patient unmet needs by accelerating patient-centric innovation. ‘GATI’ signifies speed, reflecting our focus on rapidly delivering solutions, while ‘INN’ represents innovation in India. By combining a dedicated local team, carefully selected partners, and Servier’s global R&D, manufacturing, and quality expertise, we are building a platform to execute high-quality SPCs that meet global standards and help improve adherence and outcomes for patients worldwide.”

Servier plans to invest approximately €15 million in 2026 in GATINN, working closely with Indian partners to bring high-quality, differentiated SPCs to patients. The GATINN platform integrates development, manufacturing, supply chain and quality oversight under a single India-based coordination hub. Manufacturing is carried out through selected Indian CDMO partners, while active pharmaceutical ingredients continue to be sourced from Servier’s production facilities where Servier is the originator. 

This approach demonstrates a pragmatic model of Indo–French collaboration combining French R&D expertise with India’s proven development and manufacturing quality and operational agility, enabling Servier to deliver high-quality therapies with speed, cost-efficiency to multiple international markets in Asia, Latin America, Africa, and the Middle East regions.

Speaking about the platform, *Ms. Charlotte Marmousez, Executive Vice President Corporate Strategy & Transformation, said,* “The decision to establish GATINN in India aligns with Servier’s global strategy to advance patient-centered innovation by developing top quality SPCs to improve patient adherence. This is first such platform for Servier, which will coordinate on behalf of the global Servier teams from research and manufacturing, based in the headquarters in France.”

Few projects have already been initiated with the *first international launch expected in Q2 2027* . The platform is expected to have around 5 products in development by the end of 2026, followed by the addition of approximately one new SPC each year till 2030—thereby establishing a steady pipeline of SPCs

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी 

भारतामधील तंत्रज्ञान-आधारित यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन्स आणि औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक अग्रगण्य कंपनी असलेल्या बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

सोनिया बोनफिग्लिओली, ल्युशियानो बोनफिग्लिओली, लुईसा लुसार्डी, BON-FI S.r.l. आणि बोनफिग्लिओली S.p.A हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

या ऑफरमध्ये बोनफिग्लिओली S.p.A (प्रवर्तक विक्री भागधारक) यांच्याकडून एकूण 46,998,958 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 रु. आहे.

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड ही इटलीमध्ये मुख्यालय असलेल्या बोनफिग्लिओली S.p.A चा एक भाग आहे आणि F&S Report नुसार, यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन्स (ऊर्जा परिवर्तन) आणि औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स उद्योगात जागतिक स्तरावर तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीचा महसूल 1,190.9 दशलक्ष युरो (105.91 अब्ज रु.) होता.

कंपनी वैविध्यपूर्ण अशा अंतिम-उपयोगकर्ता बाजारपेठांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक आणि उच्च अचूक अभियांत्रिकीद्वारे विकसित केलेल्या गिअरबॉक्सेस आणि ड्राइव्ह सिस्टीम्सची विस्तृत श्रेणी तयार करते (Source: F&S Report). जवळपास 70 वर्षे जागतिक पातळीवर स्थान असलेल्या बोनफिग्लिओली ब्रँडमध्ये कंपनीची परंपरा आणि प्रतिष्ठा सामावलेली आहे. भारतात 25 वर्षांहून अधिक काळ कंपनी कार्यरत आहे.

अंतिम वापराच्या उपयोजनांवर आधारित कंपनी तीन प्रमुख व्यवसाय विभागांना सेवा पुरवते: औद्योगिक आणि ऑटोमेशन सुविधा, ऑफ हायवे मोबिलिटी (दळणवळण) आणि विंड इंडस्ट्रीज. 

F&S अहवालानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कामकाजामधून मिळालेल्या महसुलाच्या दृष्टीने, बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड ही भारतातील औद्योगिक आणि ऑटोमेशन सुविधा (gear motors < 15 kNm), ऑफ हायवे मोबिलिटी (दळणवळण) आणि विंड इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत असलेल्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (“OEMs”) आणि अंतिम वापरकर्त्यांसाठी गिअरबॉक्सेस आणि ड्राइव्ह्सची सर्वात मोठी उत्पादक आहे. तसेच आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसुलाच्या दृष्टीने कंपनी भारतातील प्लॅनेटरी गिअरबॉक्सेसच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. (Source: F&S Report).

30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी कंपनीचा कामकाजामधून मिळणारा महसूल 14,601.74 दशलक्ष रु. होता आणि 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी 18,640.79 दशलक्ष रु. होता, तर करपश्चात नफा अनुक्रमे 1,651.89 दशलक्ष रु. आणि 1,946.89 दशलक्ष रु. होता.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर करण्यात आलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE सोबत मिळून “Stock Exchanges”) या स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

डीआरएचपी लिंक: https://www.axiscapital.co.in/contents/Bonfiglioli%20Transmissions%20Limited-DRHP-1770695579.pdf


Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...