Monday, June 4, 2018

मुलुंड करांचा ‘फूड-ट्रक’ फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

फूड ट्रक्स, कार्यशाळा, लाईव्ह बँड,फ्ली मार्केट, खाद्यपदार्थ  आणि कार्यशाळा स्टॉल्सच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन

मुंबई, ४ जून २०१८: नुकत्याच संपन्न झालेल्या शेठ ग्रुपच्या फूड फेस्टला लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेस्टला जणू एका सांस्कृतिक उत्सवाचे स्वरुप आले होते. या फेस्टचे २ आणि ३ जून रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य मनोरंजक कार्यक्रम झाले ज्याचा ४ हजारहून अधिक लोकांनी आनंद लुटला.

असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटाच्या माध्यमातून शोधता येतो. हेच गृहीत धरुन फूड-ट्रक्स आणि स्टॉल्समध्ये लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारी अनेक ठिकाणे उपलब्ध होती. यासोबतच येथे येणारे पाहुणे फ्ली मार्केट स्टॉल्सच्या माध्यमातून आपली शॉपिंगची हौसही भागवून घेत होते. या ठिकाणी आयोजित केलेल्या बेकींग, शु-पेंटींग तसेच कला कार्यशाळेला प्रामुख्याने लहान मुलांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी मुलांच्या कल्पकतेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करुन खर्या् जगात वावरत असताना उपयुक्त पडेल अशा कल्पकतेला वाव देण्यात आला.

येथे प्रौढांचा उत्साह वाढवणार्याण भांगडा व्यायाम तसेच फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या ठिकाणी सहभागींना मनोरंजनाबरोबरच अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या. लाईव परफॉर्मनन्सवेळी तर उपस्थितांच्या अलोट उत्साह, गर्दी आणि रेटारेटीची दृष्ये पाहण्यास मिळाली. येथे उपस्थितांना संपूर्ण मनोरंजनाचा अनुभव मिळाला.

शेठ ग्रुपच्या फूड ट्रक फेस्टमुळे मुलूंडकर नागरिकांना एका नवीन प्रकारच्या जीवनशैलीचा अनुभव घेता आला. फेस्टमध्ये खाद्यपदार्थ आणि संस्कृती दर्शनाचे एक अद्भूत मिश्रन समाविष्ट करण्यात आले होते ज्यामुळे मोठ्या समुदायाला एकत्र येऊन विकेंडचा आपला अनुभव अविस्मरणीय बनवता आला.

फेस्टच्या यशाबाबत मनोगत व्यक्त करतानाअश्विेन शेठ ग्रुपचे संचालक मौलीक शेठ यांनी सांगितले की, “कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी एकत्र येऊन एक अद्भूत मजेदार वीकेंड साजरा करावा या हेतूने आम्ही या उत्सवाचे आयोजन केले होते. एक रियल इस्टेट डेवलपर म्हणून नेहमीच्या व्यवसायाच्या पलिकडे जाऊन काही तरी वेगळा प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुलूंड म्हणजे एक समृध्द उपनगर असून येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. त्यामुळे हाच धागा पकडून या विभागातील लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत तो सांस्कृतिक भाग समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विश्वांस वाटतो की, आम्ही याबाबत लोकांना दिलेले वचन पाळले आणि त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील असा मनोरंजक विकेंड उपलब्ध करुन दिला.’’



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...