Tuesday, May 21, 2019



‘AB आणि CD’च्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनी बिग बी दिसणार मराठी सिनेमात

 OR
 बिग बी यांच्या ‘AB आणि CD’ या मराठी सिनेमाचा मुहुर्त संपन्न




आपल्या मराठी सिनेमांच्या विषयात नेहमीच नाविन्य असतंनवीन मराठी सिनेमा आला की प्रेक्षकांना खात्री असते की काहीतरी नवीन अनुभवयाला मिळणारसिनेमाच्या विषयासह जर सिनेमातील पात्र देखील प्रेक्षकांच्या आवडीची असतील तर बात काही औरच असतेअशाच एका नवीन सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आणि या सिनेमाचे नाव आहे ‘AB आणि CD’. या सिनेमाच्या मुहुर्ताच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक खास खुशखबर मिळणार आहे आणि ती खूषखबर बिग बी यांच्या रुपातून येणार आहेम्हणजेचतब्बल २५ वर्षांनी बिग बी अमिताभ बच्चन ‘AB आणि CD’ या सिनेमाच्या निमित्ताने मराठीमध्ये एण्ट्री घेणार आहेत.




 नुकताचया सिनेमाचा मुहुर्त सोहळा माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडलात्यांच्यासह विक्रम गोखलेसागर तळाशिलकरसीमा देशमुखलोकेश गुप्तेजयंत सावरकरसुनिल गोडबोलेअरुण पटवर्धनप्रशांत गोखलेसुभाष खुंडेमुक्ता पटवर्धनअक्षय टंकसाळेसायली संजीव आणि साक्षी सतिश हे देखील यावेळी उपस्थित होते.





डिजीटल मिडीयावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणा-या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे  मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या सिनेमात अमिताभ बच्चनविक्रम गोखलेसुबोध भावेसायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेतअमिताभ बच्चन यामध्ये कॅमिओ रोल साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतीलसिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि लवकरच ‘AB आणि CD’ प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...