Thursday, May 2, 2019

महाराष्ट्रदिनी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू विश्वजीत सांगळे यांनी पहिल्यांदाच केले श्रमदान

       महाराष्ट्रदिनी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू विश्वजीत सांगळे यांनी पहिल्यांदाच केले श्रमदान

1 मे दिवशी पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात भाग घेऊन आंतरराष्ट्रीय टेनिसपटू विश्वजीत सांगळे यांनी पहिल्यांदाच श्रमदान केले. गेली बारा वर्ष विश्वजीतने लॉन टेनिस या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम अशी कामगिरी केली आहे. आतापर्यंत विशवजीतने कझाकिस्तान, सिंगापूर आणि फ्रान्स ह्या देशांमध्ये टूरनामेंट जिंकल्या आहेत. त्यांनी नुकतेच फ्रान्स फेडरेशन टेनिस या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. पाणीटंचाईमुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले आहे. अमिर खान तसेच अनेक कलाकार महाश्रमदानात दरवर्षी सहभाग घेतात.ते पाहून प्रोत्साहित होऊन त्याने श्रमदान करण्या ठरवले.

 टेनिसपटू विश्वजीत सांगळे श्रमदानाच्या अनुभवाविषयी सांगतो, ''मी १ मे दिवशी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धोंडबार गावात श्रमदान केले. सिन्नर येथे पानी फाउंडेशनच्या कामात मला सहभागी होऊन या महत्वाच्या कामात खारीचा वाटा उचलता आला याबद्दल मी पानी फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. पर्यावरणाप्रती बांधिलकी व सामाजिक जबाबदारी म्हणून मला श्रमदान करता आले याचे समाधान वाटते.''




धोंडबार गावातील दुष्काळाबाबत तो सांगतो, ''लॉन टेनिसमुळे मला आपल्या देशाचे व राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेक वेळा मिळाली.मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मी नेहमीचप्रयत्न केला व पुढे ही करणार आहे. महाराष्ट्रात सध्या भीषण परिस्थिती आहे. गावागावांत नदी, तलाव, विहीरी कोरडे पडले आहेत. आम्ही नाशिकमधील धोंडबार गावात गेलेलो. त्या गावांत दूरदूरपर्यंत कुठेच पाण्याचे स्त्रोत आम्हाला दिसले नाही. अशा रखरखत्या दुष्काळात माणसं कशी बरी राहत असतील ह्याचा मी अजूनही विचार करतोय. पानी फाउंडेशन करत असलेले काम ही काळाची गरज आहे. हे महत्वाचे काम मला अनुभवता आले व या कार्याचा घटक होऊन श्रमदान ही करता आले. ह्या दाना एवढे श्रेष्ठदान कोणतेच नसेल.''





तो पुढे म्हणतो, ''आपण सर्वांनी पाण्याचा काटसरीने वापर करायला हवा आहे.पावसाचे पाणी अडवून ते जिरविण्याची बौधारे बांधणे व चर खणणे या कामात समाजातील प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलायलाच हवा. तसेच महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. मी पुढच्यावर्षी ही आवर्जून पाणी फाऊंडेशन आयोजित श्रमदानात सहभागी होणार आहे.''

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...