Friday, May 3, 2019

      'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या पहिल्या २ पर्वांच्या यशाची सक्सेस पार्टी












महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि दुसरे पर्व अत्यंत यशस्वी ठरले असून १०० एपिसोड्सचा टप्पाही पार झाला आहे. म्हणूनच हे यश साजरे करण्याकरता५ मे - अर्थात 'जागतीक हास्य दिनाचेऔचित्य साधून  सोनी मराठीकडून एक जंगी 'सक्सेस पार्टी' आयोजित करण्यात आली होती. मराठी टीव्ही आणि चित्रपटविश्वातील तारकांच्या उपस्थितीने सजलेली ही पार्टी मुंबईमध्ये उत्साहात पार पडली. या पार्टीला प्रसाद ओकप्राजक्ता माळी हे स्टार्स तसेच समीर चौगुलेविशाखा सुभेदारअंशुमन विचारेनम्रता संभेरावअरुण कदमपृथ्वीक कांबळेसचिन मोते व सचिन गोस्वामी इ. कलाकार मंडळींची उपस्थिती लाभली. सोनी मराठीचे सतत नवनव्या धाटणीचे व दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सक्सेस पार्टीच्या निमित्ताने विनोदातही आपण मागे नसल्याचेच सोनी मराठीने दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...