Tuesday, May 21, 2019


क्रूझवर पार पडली 'कोण होणार करोडपती?'ची अनोखी पत्रकार परिषद

'कोण होणार करोडपती?'ची पत्रकार परिषद थेट क्रूझवर

'कोण होणार करोडपती?'मधून नागराज नव्या भूमिकेत
२७ मेपासून सोमवार ते गुरुवार .३० वाजता



 पत्रकार परिषद म्हटली म्हणजे प्रश्न आलेच आणि ती पत्रकार परिषद जर 'कोण होणार करोडपती?'ची असेल तर जरा जास्तच प्रश्नअसाच प्रश्नांचा खेळ रंगला होता आंग्रिया क्रूझवर जिथे पार पडली 'कोण होणार करोडपती?'ची पत्रकार परिषदक्रूझवर पत्रकार परिषद करण्याची ही पहिलीच वेळत्याला कारण ही तसंचजगण्यासाठीची उत्तरं शोधताना आपण आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य घडवत असतोअसंच एक उत्तर कानोजी आंग्रेंनी शोधलं आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीचं रक्षण केलंया महान योध्द्याच्या नावावरूनच या क्रूझला आंग्रिया क्रूझ हे नाव देण्यात आलंया आरमारच्या नौदल प्रमुखाने शोधलेल्या उत्तरांमुळे कित्येक वर्ष किनारपट्टी सुरक्षित राहिलीउत्तर शोधलं की जगणं बदलतं या टॅगलाइनवर उभ्या असणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमाची सुरूवात सोनी मराठीने उत्तरातूनच केलीया पत्रकार परिषदेला सोनी मराठीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एनपीसिंहबिझनेस हेड अजय भाळवणकर, 'कोण होणार करोडपती?'चे सूत्रसंचालक नागराज मंजुळे उपस्थित होतेतर स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठीकोण होणार करोडपतीकिती महत्त्वाचा आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू रॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणारे रंगा गोडबोले आणि व्हीप्रफुलचंद्र यांनीही उपस्थिती दर्शवली.





उत्तर शोधलं की जगणं बदलतं या पार्श्वभूमीवर आखला गेलेला हा फॉर्मट खऱ्या अर्थी प्रेक्षकांसाठी आपलं नशिब बदलण्यासाठीची एक सुवर्णसंधी घेऊन आला आहेयामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबरोबरच जे प्रेक्षक घरी बसून हा कार्यक्रम पाहणार आहेतत्यांच्यासाठी ही घरबसल्या जिंकण्याची तजवीज कोण होणार करोडपतीने करून ठेवली आहेत्याशिवाय आपल्या समाजासाठी झटणाऱ्या आणि आपल्या कृत्याने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या कर्मवीरांच्या भेटीही या कार्यक्रमातून होणार आहेततेव्हा हे ऑल-इन-ऑल एंटरटेनमेंटचं बेस्ट पॅकेज आहेअसं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



या पत्रकार परिषदेत बोलताना सोनी मराठीचे बिझनेस हेड, अजय भाळवणकर म्हणाले, "कोण होणार करोडपती? च्या या नव्या सीझनमध्ये आम्ही बऱ्याचशा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी सूत्रसंचालकाच्या निवडीपासून ते कर्मवीर या दर गुरूवारी सादर होणाऱ्या विशेष भागापर्यंत. ज्यात सामान्यांमध्ये राहून आपल्या कर्तृत्त्वाने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या काही कर्मवीरांना आम्ही सलाम करणार आहोत. त्याशिवाय या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच एक अभिनेता नाही तर दिग्दर्शक एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. नागराजमध्ये असणारा दिग्दर्शक समोर बसणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट सुंदर पध्दतीने प्रेक्षकांसमोर मांडेल, याची आम्हाला खात्री आहे. त्यात सोनी मराठीवरून नागराजचं छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे."



तर या कोण होणार करोडपती?च्या सूत्रसंचालकाची धुरा सांभाळणाऱ्या नागराज मंजुळे यांनी पहिल्या-वहिल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणत, "या कोण होणार करोडपती च्या निमित्ताने बऱ्याचशा जपून ठेवाव्या अशा पहिल्या गोष्टी घडल्याचं म्हटलं आहे. माझं पहिलं सूत्रसंचालन, .व्ही. प्रफुलचंद्रबरोबर गायलेलं कोण होणार करोडपती?चं टायटल ट्रॅक ही माझ्या आयुष्यातलं पहिलंच गाणं आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच मी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तेव्हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या या पहिल्या गोष्टींसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या पदार्पणातली सूत्रसंचालकाची भूमिका उत्कृष्ट पध्दतीने निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे."
आयुष्याच्या वाटेवर चालताना क्षणोक्षणी आपल्या ज्ञानात भर पडत असतेकधी पुस्तकंकधी मित्र तर कधी परिस्थिती शिक्षक होऊन आपल्याला जगण्याचे धडे देत असतातप्रत्येक वळणावर मिळवलेल्या याच ज्ञानाच्या जोरावर आपल्या स्वप्नांचा महाल बांधण्यासाठी सज्ज व्हा २७ मे पासून रात्री .३० ते .३०, कारण सोनी मराठीवर सुरू होणार आहे 'कोण होणार करोडपती?'चा खेळ!


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain

  ‘Yaar Naraz Na Ho' - A Melody of Friendship and Connection crafted by Ramji Gulati which marks the debut of Manish Jain aka JJ Communi...