Wednesday, October 16, 2019

अरविंद स्मार्टस्पेसेस व एचडीएफसी कॅपिटल यांनी निर्माण केला 250 कोटी रुपयांचा अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग प्लॅटफॉर्म

अरविंद स्मार्टस्पेसेस व एचडीएफसी कॅपिटल यांनी निर्माण केला 250 कोटी रुपयांचा अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग प्लॅटफॉर्म 

अरविंद स्मार्टस्पेसेस  एचडीएफसी कॅपिटल यांनी निर्माण केला 250 कोटी रुपयांचा अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग प्लॅटफॉर्म

अहमदाबाद14 ऑक्टोबर, 2019: अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड (“एएसएल”) या लालभाई समूहाचा भाग असणाऱ्या, अहमदाबाद येथे मुख्यालय असणाऱ्या व भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असणाऱ्या कंपनीने  एचडीएफसी लि.च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असणाऱ्या एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हॉयजर्स लिमिटेडतर्फे व्यवस्थापित एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड 1 (एच-केअर 1) बरोबर भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. ही भागीदारी भारतातील अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग प्रोजेक्टच्या विकासावर भर देणार आहेतत्याचप्रमाणे घरांची गुणवत्ता व वेळेवर पूर्तता राखण्याची दक्षता घेणार आहे. प्रस्तावित विकासाची जबाबदारी 250 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अरविंद होम्स प्रायव्हेट लिमिटेड” या स्पेशल परपज व्हेइकलद्वारे पार पाडली जाणार आहे.

एचडीएफसी लि.च्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सुद कर्नाड म्हणाल्या, भारतात घरांची कमालीची निकड आहे आणि वाढत्या शहरीकरणाबरोबर अफोर्डेबल हौसिंगला असणारी मागणीही वाढत जाणार आहे. भारतातील आघाडीच्या विकसकांना लवचिकदीर्घ-कालीन स्वरूपाचे भांडवल उपलब्ध करूनदेशातील अफोर्डेबल हौसिंग क्षेत्रातील मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करणेहा एचडीएफसीचा प्रयत्न आहे. आमची मूल्य व दूरदृष्टी यांना साजेसे असणाऱ्या अरविंद स्मार्टस्पेसेससारख्या विकसकांशी आम्ही भागीदारी करत आहोत.”

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हॉयजर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रूंगता यांनी सांगितले, खर्चाच्या बाबतीत किफायतशीर पद्धतीने अत्यंत दर्जेदार अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग विकसित करण्यावर आम्ही अरविंद स्मार्टस्पेसेसच्या भागीदारीच्या माध्यमातून भर देणार आहोत. विकास व प्रकल्पांची पूर्तता या बाबतीत चांगली कामगिरी केलेल्या आणि अफोर्डेबल हौसिंगच्या बाबतीत दीर्घकालीन विचार करणाऱ्या आघाडीच्या विकसकांशी भागीदारी करण्याच्या एचडीएफसी कॅपिटलच्या धोरणाच्या अनुषंगाने आम्ही हे ठरवले आहे.

या सहयोगाविषयी बोलताना, अरविंद स्मार्टस्पेसेसचे अध्यक्ष संजय लालभाई यांनी सांगितले, “या भागीदारीमुळे आम्हाला आमच्या प्रगतीला व नव्या प्रकल्पांतील गुंतवणुकीला चालना देणे शक्य होणार असल्याने ही भागीदारी आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भारतीय व्यवसायातील या दोन नामवंत कंपन्या एकत्र आल्याने संबंधित सर्व घटकांसाठी दीर्घकालीन मूल्य तयार होईलयात शंकाच नाही. एचडीएफसी कॅपिटल व अरविंद गुंतवणार असलेल्या नव्या निधीमुळे देशातील कार्याची आणि नव्या प्रकल्पांची व्याप्ती वाढेल. आम्ही ज्या विश्वासाच्या व उत्कृष्टतेच्या परंपरेसाठी नावाजले जातो त्यामध्ये वाढ करण्यासाठीही यामुळे मदत होणार आहे.’’

अरविंद स्मार्टस्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कमल सिंगल यांनी सांगितले ‘’प्रस्तावित रचनेमुळे कंपनीसमोरील भांडवलाची अडचण दूर होणार आहेशिवाय व्यवसायातील अल्प व मध्यम चक्रांसाठी आवश्यक असलेले दीर्घकालीन भांडवल उभारण्यासाठी बॅलन्सशीटवर विनाकारण ताण येऊ न देता निधी उभारता येईल इतकी लवचिकता यामध्ये आहे.

अरविंद स्मार्टस्पेसेसविषयी:

लालभाई ग्रुपच्या 80 वर्षांच्या परंपरेवर आधारित असणारी आणि 2008 या वर्षात स्थापन झालेली अरविंद स्मार्टस्पेसेस ही भारतातील एक आघाडीची रिअल इस्टेट विकास कंपनी आहे व तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. देशात अंदाजे 7 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा रिअल इस्टेट विकास करणारी ही कंपनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी रिअल इस्टेट सोल्यूशन्स उपलब्ध करतेतसेच ती देशातील आघाडीची कॉर्पोरेट रिअल इस्टेट कंपनी म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. कंपनीने अहमदाबादगांधीनगरबेंगळुरू व पुणे येथे रिअल इस्टेट विकास केला आहे. अरविंद या सक्षम ब्रँडच्या मदतीने आणि अगोदर पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून मिळवलेल्या विश्वासार्हतेच्या आधारे कंपनीने पुढील प्रगतीचे व विस्ताराचे आक्रमक नियोजन केले आहे.

एचडीएफसी लि.विषयी:

भारतातील रिटेल हौसिंग फायनान्समधील प्रवर्तक हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.ने (एचडीएफसी) 72 लाखांहून अधिक कुटुंबांना स्वतःचे घर घेण्यासाठी सहाय्य केले आहे. मूल्यवर्धित सेवात्या देण्यासाठी प्रशिक्षित व अनुभव प्रोफेशनलची विशेष टीमही एचडीएफसीची मूलभूत क्षमता आहे. एचडीएफसीने ग्राहकोपयोगी सेवा देण्याचा उल्लेखनीय विक्रम नोंदवला आहे. 

आशिया, आफ्रिका व पूर्व युरोप येथील विकसनशील देशांमध्ये तांत्रिक सहकार्य व कन्सल्टन्सी असाइन्मेंट उपलब्ध करणारी मॉडेल हौसिंग फायनान्स कंपनी म्हणून एचडीएफसीकडे पाहिले जाते. एचडीएफसी सरासरी 27.8 लाख रुपये होम लोन देते. प्रधान मंत्री आवास योजनेच्या (अर्बन) क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीमअंतर्गत एक लाख लाभार्थींचा टप्पा ओलांडणारी एचडीएफसी ही पहिली संस्था आहे.

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हॉयजर्सविषयी:

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हॉयजर्स लिमिटेड ही एचडीएफसी लिमिटेडची 100% उपकंपनी रिअल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी फायनान्सिंगसाठी गुंतवणूक व्यवस्थापन सेवा देते आणि ही देशातील एक सर्वात मोठी फंड व्यवस्थापक आहे. ही कंपनी एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड 1 (एच-केअर 1) व एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड 2 (एच-केअर 2) या सेबीकडे नोंदणीकृत असणाऱ्या कॅटेगरी II अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडांची फंड मॅनेजर आहे. एच-केअर फंडातील प्राथमिक गुंतवणूकदारांमध्ये अबु धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) व नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीचा समावेश आहे.

एच-केअर 1 व एच-केअर 2 यांनी एकत्रितपणे भारतातील 20 प्रमुख शहरांतील अफोर्डेबल व मिड-इन्कम निवासी प्रकल्पांसाठी 1.1 अब्ज डॉलरची सुविधा निर्माण केली आहे. या सुविधेचे प्राथमिक उद्दिष्ट भारतात अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग विकसित करण्यासाठी जमीन व मंजुरी-पूर्व टप्प्यामध्ये प्रमुख विकसकांना दीर्घकालीनइक्विटी व मेझनाइन भांडवल पुरवणेहे आहे. सध्याभारतातील आघाडीच्या विकसकांनी अफोर्डेबल व मिड-इन्कम हौसिंग क्षेत्रामध्ये अंदाजे 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करायचे ठरवले आहे.

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हॉयजर्स लिमिटेडने अलीकडेच एचडीएफसी अफोर्डेबल रिअल इस्टेट अँड टेक्नालॉजी प्रोग्रॅम (H@ART) सुरू केला आहे. H@ART कार्यक्रम अफोर्डेबल हौसिंग क्षेत्रात नावीन्य व कार्यक्षमता आणणाऱ्या रिअल इस्टेट तंत्रज्ञान कंपन्यांना मार्गदर्शनभागीदारी व गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करतो.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...