Saturday, October 26, 2019

अभिनेत्री स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

अभिनेत्री स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

अभिनेत्री स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक
दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे. स्पृहाची यंदाची दिवाळी तिच्या घरच्यांसोबत नाही आहे. ती एकटी भोपाळला असणार आहे. आणि त्यामूळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.
स्पृहा जोशी ह्याविषयी सांगते, सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.

स्पृहा जोशी पूढे म्हणते, खरं तर, दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता, की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं, की, सणाच्यादिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.” 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...