Tuesday, October 8, 2019

नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास

नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास
नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास
तेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केलाय. असे फोटोशूट करण्याचे तेजस्विनीचे हे तिसरे वर्ष आहे.



तेजस्विनी पंडित म्हणते, पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होतं. आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केले. दूस-या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिस-या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं वाटलं.



तेजस्विनी म्हणते, ब-याचदा कलाकार हा टिकेचा विषय असतो. आम्ही मत नाही मांडलं तरीही टिका होते. आणि मत मांडलं तरीही आम्ही आजकाल ट्रोल होतो. पण फोटोशूट व्दारे जेव्हा मी काही मुद्दे मांडले तेव्हा माझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला, ह्याचा आनंद आहे.

तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली. तेजस्विनी म्हणते, नवरात्री म्हणजे फक्त नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये फोटो न काढता आता अनेकजणं कल्पकतेने काही नवं करतायत, ह्याचा आनंद आहे. अनेक लोकं मला सोशलमीडियावरून टॅगही करतात. अशावेळी खूप छान वाटतं.

तेजस्विनीच्या यंदाच्या फोटोशूटला पाहिल्यावर त्यामागे असलेल्या मेहनतीबद्दल विचारल्यावर ती म्हणते, माझ्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं आणि कल्पकतेचं हे फलित आहे. प्रत्येक फोटोसाठी मला मेकअप करून तयार व्हायलाच सूमारे तीन तास लागायचे. त्यानंतर फोटो काढून त्यावर व्हीएफेक्ससाठी पूढचा अडीच दिवस लागायचा. असे आम्ही नऊ फोटोशूट केले. ही प्रक्रिया खूप रंजक होती.” 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Guitarist extraordinaire Amandeep Singh Strikes a Chord of Brilliance in Diljit Dosanjh's Vancouver Concert

  Guitarist extraordinaire Amandeep Singh Strikes a Chord of Brilliance in Diljit Dosanjh's Vancouver Concert In a spectacular blend of ...