Friday, October 11, 2019

आपल्या कार्यालयांतून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी स्टार आणि डिस्ने इंडिया बांधील

आपल्या कार्यालयांतून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी स्टार आणि डिस्ने इंडिया बांधील 
आपल्या कार्यालयांतून प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी स्टार आणि डिस्ने इंडिया बांधील

मुंबई10 ऑक्टोबर 2019 – स्टार आणि डिस्ने इंडियाने आज आपल्या कार्यालयांतून एकदाच वापरल्या जाऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करणार असल्याची बांधिलकी घोषित केली. कंपनी आपल्या कार्बन उत्सर्जनाबद्दल आणि त्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रचंड जागरूक आहे.

स्टार आणि डिस्ने इंडियामद्ये आम्ही कायमच जबाबदार कॉर्पोरेट नागरिक होण्यावर भर दिला असून या छोट्याशा कृतीसह आम्हाला अधिक शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे. आज प्लॅस्टिकचा कचरा जगभरातील समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असून दरवर्षी 40 टक्के प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात टाकला जातो आणि त्यातील 40 टक्के प्लॅस्टिक हे केवळ एकदा वापरून फेकून दिलेले असते,’ असे उदय शंकर वॉल्ट डिस्ने कंपनी एपीएसीअध्यक्षस्टार आणि डिस्ने इंडिया म्हणाले. ‘अधिक चांगल्या भविष्यासाठी आपण सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे,’ असेही त्यांनी अधोरेखित केले.

या निर्णयाचा एक भाग म्हणून स्टार आणि डिस्ने इंडियाने आपल्या कार्यालयाच्या परिसरात एकदाच वापरता येण्याजोग्या प्लॅस्टिकला पर्याय तयार केले आहेत. प्लॅस्टिक कप्सची जागा कागदी कप्सनीप्लॅसिट स्टरर्सची जागा लाकडी स्टरर्सनीचहा व कॉफी सॅशेची जागा कागदी सॅशेने घेतली आहेतर छत्र्यांसाठी विघटन होऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकचे वेष्टन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याशिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्यांची जागा काचेच्या भांड्यांनी घेतली आहे.

2 ऑक्टोबर 2019 रोजी स्टार नेटवर्कचाच भाग असलेल्या नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने प्लॅनेट की प्लॅस्टिक हा शपथ उपक्रम सुरू केला आहेज्यात एकदाच वापरल्य जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या समस्येविषयी लोकांना जागरूक करून देशभरातील लोकांना शपथ घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. या उपक्रमाला 47 हजार ट्विट्स आणि सोशल मीडियावर 881 दशलक्ष सोशल इंप्रेशन्ससह भरघोस प्रतिसाद मिळाला. या शपथेमुळे पहिल्या 24 तासांतच 25 दशलक्ष प्लॅस्टिकच्या वस्तू कमी करण्याची बांधिलकी तयार झाली. 2012 मध्ये स्टारने डिजिटल ब्रॉडकास्ट इकोसिस्टीमचा पायंडा पाडत आपला कंटेंट टेपवरून क्लाउडवर स्थलांतर करून कार्बन उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी केले होते.

समाप्त -

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...