Monday, January 27, 2020

'गोव्याच्या किनाऱ्यावफेम सुहृद वार्डेकर आणि सायली यांचा 'दाहचित्रपट 'व्हॅलेंटाईन डेे'ला होणार प्रदर्शित


एक विशेष दिवस असला की त्या विशेष दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी अनेक योजना केल्या जातातअसाच एक खूप स्पेशल दिवस फेब्रुवारी महिन्यात येतो आणि तो दिवस म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'गोव्याच्या किनाऱ्यावफेम सुहृद वार्डेकर आणि मराठी चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी सायली संजीव यांचा चित्रपट 'दाह मर्मस्पर्शी कथायेत्या 'व्हॅलेंटाईन डेे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहेसुहृद आणि सायली यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून पसंतची पावती मिळवली आहेआणि दोघेही पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'दाह मर्मस्पर्शी कथाया चित्रपटातून नात्यांच्या अनेक बाजू आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहेआपली किंवा परकी असा भेदभाव  करता प्रत्येक नात्यात मायेचीप्रेमाची भावना असते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉसतिश (अतुलसोनोने यांनी कथा लिहिली आहेसायली संजीव आणि सुहृद यांच्यासह गिरीश ओकराधिका विद्यासागरयतिन कार्येकरउमा सरदेशमुखकिशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी  संगीत दिले आहे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेतसंगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकरमनिष राजगिरेअनिरुध्द वानकरबेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहेपटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेतउमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे.

'दाह मर्मस्पर्शी कथा१४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...