Monday, January 6, 2020


सावित्रीबाईंच्या नायगाव येथील जयंती उत्सवाला 'सावित्रीजोतीमालिकेच्या
कलाकारांची उपस्थिती
 जानेवारीपासून सावित्रीजोती मालिका सोनी मराठीवर

सावित्रीजोती मालिकेच्या संघातर्फे सावित्रीबाई फुले ह्यांना मानवंदना

सावित्रीमाई फुले स्मारकाला सावित्रीजोती मालिकेच्या कलाकारांची भेट
 जानेवारीपासून सावित्रीजोती मालिका सोनी मराठीवर

नायगाव येथील सावित्रीबाईंच्या जयंती उत्सवाला
सावित्रीजोती मालिकेच्या कलाकारांची उपस्थिती

सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती - सोनी मराठीवर  जानेवारीपासून
सावित्रीजोती फुले दांपत्याचा जीवनपट

सावित्रीजोती मालिका  जानेवारीपासून
फुले स्मारकाला सोनी मराठी वाहिनीची विशेष मानवंदनासावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी फक्त स्त्रीशिक्षणाचेच नाहीतर संपूर्ण समाजाच्या विकासाचे कार्य केले आहेफुले दांपत्याचे आयुष्य ही एक महागाथा आहेसमाजाने सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी आणि वेळोवेळी उजळणी करावी अशी त्यांची जीवनकथा आहेभारतातली पहिली शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळतोतो मान मिळवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेतत्या काळच्या सनातनी समाजाच्या बंधनांना झुगारून त्यांनी स्वतःसाठीच नाहीतर इतर स्त्रियांसाठीसुद्धा प्रगतीचा मार्ग मोकळा करून दिलासावित्रीबाई फुले यांना स्त्रीशिक्षणाची जननी म्हणणे चुकीचे ठरणार नाही.स्त्रीशिक्षणाच्या याच जननीची जयंती गेल्या १८९ वर्षांपासून त्यांच्या जन्मगावीम्हणजेच नायगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी होतेया जयंतीच्या निमित्ताने नायगाव येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमा होतोसावित्रीबाईंच्या जन्मवाड्यापासून ते गावातल्या पटांगणापर्यंत पालखी निघतेजयंतीच्या निमित्ताने गावात आलेले सर्व लोक या  पालखीत सहभागी होतातही ज्ञानाची दिंडी पाहण्यास अतिशय नयनरम्य असते.  यंदाच्या वर्षी सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'सावित्रीजोतीआभाळाएवढी माणसं होती या मालिकेतील समर्थ पाटील (छोटे जोतीरावआणि तृषनिका शिंदे (छोट्या  सावित्रीबाई)  पात्रे साकारणाऱ्या बालकलाकारांनी या पालखीत सहभाग घेतलादरम्यान मालिकेचे मुख्य कलाकार अश्विनी कासार (मोठ्या सावित्रीबाईआणि ओम्का गोवर्धन (मोठे जोतीरावहे देखील या जयंती सोहळ्यात उपस्थित होते.

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा स्त्रीला एक व्यक्ती म्हणूनदेखील समाजात मान नव्हतातेव्हा जोतीराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि इतरांना शिकवण्यायोग्य घडवलेपुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री नोकरीसुद्धा करू शकते हे त्या काळातील रूढिवादी समाजाला दाखवून दिले आणि स्त्री-पुरुष समानतेचे एक उत्तम उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलेपण सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कार्य हे फक्त स्त्रीशिक्षणापुरते मर्यादित नव्हतेसमाजात समानता नांदावीस्पृश्य-अस्पृश्य हा भेद नाहीसा व्हावा यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केलेआपल्या वाड्यातील विहीर गावातील अस्पृश्यांसाठी खुली केली हा त्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न.त्या काळातल्या सनातनी आणि रूढिवादी समाजाने त्यांना नाना तऱ्हेने त्रास द्यायचा प्रयत्न केलासावित्रीबाईंनी स्वतः शेणाचे गोळेदेखील अंगावर झेलले आहेत आणि वेळप्रसंगी समोरच्याला चांगली चपराकदेखील लगावली आहेआपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभे असलेले आणि सर्व स्त्री जातीच्या उद्धारासाठी कळकळीने काम करणारे जोतीराव त्या शतकातील काही मोजक्या पुढारलेल्या विचारांच्या पुरुषांपैकी एक होतेजोतीरावांनी सावित्रीबाईंना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिले  कधीच आपल्यापेक्षा कमी लेखले नाही. 'सावित्रीजोतीया नावातसुद्धा सावित्रीबाईंचा उल्लेख प्रथम येतोजोत म्हणजे आधारहाआधार जोतीरावांनी आणि सावित्रीबाईंनी एकमेकांना आजन्म दिला.अशा निःस्वार्थी जोडप्याच्या सहजीवनावर जर एखाद्या वाहिनीला मालिका करण्याचा मोह झालातर तो योग्यच आहेया आदर्श जोडप्याच्या याच सहजीवनाचात्याच्या कर्तृत्वाचा आणि पुढारलेल्या विचारांचा इतिहास 'सावित्रीजोती' - आभाळाएवढी माणसं होती या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.नायगाव येथे झालेल्या १८९व्या जयंती सोहळ्यादरम्यान 'सावित्रीजोतीमालिकेची पत्रकार परिषद घेण्यात आलीया परिषदेला अभ्यासक  प्राहरी नरकेसोनी मराठी वाहिनीचे बिझिनेस हेड अजय भाळवणकर आणि दशमी निर्मिती संस्थेचे संचालक नितीन वैद्य उपस्थित होते.

सावित्रीबाईंच्या जन्मतिथीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीचे बिझिनेस हेड अजय भाळवणकर ह्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी ‘ सोनी मराठी सावित्रीजोती शिष्यवृत्ती ह्या नावाने  शिष्यवृत्ती घोषित केली.

अन्यायाविरुद्ध  आवाज उठवण्याचे धाडसउत्तरं शोधत राहण्याची सवयएकमेकांवर निःसीम प्रेम आणि अपार विश्वास अशा अनेक पैलूंनी  या आदर्श जोडप्याचा जीवनप्रवास 'सावित्रीजोतीह्या मालिकेतून आपल्याला  पाहायला मिळणार आहेतर पाहायला विसरू नका सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती जानेवारीपासून  सोमवार ते शनिवार संध्याकाळी .३० वाजता फक्त सोनी मराठीवर .







No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...