Saturday, October 16, 2021

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’! - १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर

 




स्वरदा ठिगळे  साकारणार  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी! - १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर.

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोचली होतीयासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होतीडॉअमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि  थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहेत्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्याराज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधूनज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्यास्वरदा ठिगळे ह्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदाअभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा

 कसून सरावाला सुरुवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत उलगडणार आहेयेत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...