Friday, October 8, 2021

आजपासून मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे यांच्यामुळे जीव बाजिंद होणार!

 मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीमुळे 'जीव झाला बाजिंद'



टेलिव्हिजनवर आणि सिनेमांत झळकणारी सुंदरनिरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे म्युझिकल भेट ज्यामुळे सर्वजण म्हणणार 'जीव झाला बाजिंद'...

 

आतापर्यंत मोनालिसाने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेतत्यामुळे तिच्या अभिनयातला वेगळेपणा जाणवला आणि तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर जीव लावतात. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचंगावरान बाज असलेल्या 'जीव झाला बाजिंदया गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे. गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल पण या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे. ८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे गाणं प्रदर्शित झाले आहे.

 

या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

 

एकूणच गावाकडचे वातावरणदोन कलाकारांमधील केमिस्ट्रीगाणंआवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की... नक्की पाहा 'जीव झाला बाजिंदहे गाणं 'मराठी Originals' या यूट्यूब चॅनेलवर...

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...