Friday, October 22, 2021

सोनी मराठी वाहिनीवर अनुभवा भक्तिरसाचा दीड तास! - २५ ऑक्टोबरपासून, संध्या. ६.३० वाजल्यापासून.

 


सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांचीआणि 'ज्ञानेश्वर माउलीया मालिका सध्या रोज एक तास प्रेक्षकांना भक्तिरसाचा आनंद देताहेतपण २५ ऑक्टोबरपासून या आनंदात भर पडणार आहेप्रेक्षकांना संध्याकाळी .३० वाजल्यापासून दीड तास या भक्तीरसाचा आस्वाद घेता येणार आहेया दीड तासात 'गाथा नवनाथांचीमालिकेत मच्छिन्द्रनाथांचे स्त्रीराज्यात आगमन होणार असून राज्यातल्या स्त्रियांना नाथांबद्दल कुतूहल आहेलवकरच मैनावतीचा नाथांशी विवाह होणार असल्याचीही शक्यता आहेमैनावतीने पाठवलेल्या गोष्टी नाथ स्वीकारणार कामैनावतीने जाहीर केलेल्या उत्सवाला नवीन वेश परिधान करून जाणार कायाची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेतमालिकेत मोठ्या गोरक्षनाथांचा प्रवेशही होणार आहेगुरू संकटात आहेत आणि त्यांना शोधून त्या संकटातून सोडवलं पाहिजे या हेतूने गोरक्षनाथांचा प्रवास सुरू होताना दिसणार आहे.

 

              तर 'ज्ञानेश्वर माउलीमालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांचा आई-वडिलांच्या देहान्त प्रायश्चित्तानंतरचा खडतर प्रवास सुरू होणार आहेमुक्ताई आजारी पडल्यावर तिच्यासाठी सप्तपर्णीचे वेल  आणण्यासाठी माउली स्वतः निबिड अरण्यात जाणारतिथे त्यांचा सापाशी सामना होणारामाउलींना स्फुरलेला दिवाळी अभंगत्यांनी साजरी केलेली दिवाळीशुद्धिपत्रासाठी सुरू झालेली पैठण यात्रा आणि माउलींकडून झालेली हरिपाठाची निर्मितीअसे अनेक अनोखे प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

 

अनुभवाभक्तीरसाचा दीड तास२५ ऑक्टोबरपासून संध्याकाळी .३० वा. सोम.- शनि. आपल्या  सोनी मराठी वाहिनीवर,


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...