दिवाळीनिमित्त सह्याद्री देवराईबरोबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचे वृक्षारोपण.
दिवाळीचं औचित्य साधून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या कलाकारांनी नॅशनल पार्क, बोरिवली येथे वृक्षारोपण केले. प्रेक्षकांना हसविण्यात माहीर असलेले हे कलाकार पर्यावरणाबाबतही जागरूक आहेत. दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, निखिल बने, दत्तात्रेय मोरे, श्यामसुंदर राजपूत, अरुण कदम या कलाकारांनी यंदा हरित दिवाळी साजरी केली. 'सह्याद्री देवराई' या सामाजिक संस्थेच्या मदतीने हे वृक्षारोपण केले. या संस्थेचे खजीनदार सचिन चांदणे आणि चैतन्य गाडगीळ, सचिन ठाकुर, निशांत भारद्वाज, समाधान लबदे, शंतनु हेर्लेकर आणि सिद्धार्थ पडियार हे सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST