Thursday, September 29, 2022

हरीओम'मधील 'उठ गड्या' हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

'हरीओम'मधील 'उठ गड्या' हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित 

नुकतेच एक प्रेमगीत प्रदर्शित झाल्यानंतर 'हरीओम' चित्रपटातील आणखी एक वेगळ्या धाटणीचे स्फूर्तिदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'उठ गड्या' असे या गाण्याचे बोल असून हरी आणि ओम या वीर बंधूंवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. देशप्रेमाने झपाटलेल्या या मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी आणि त्यांचा खडतर प्रवास या गाण्यातून आपल्याला दिसतो. 'उठ गड्या' हे गाणे नंदेश उमप यांनी गायले असून निरंजन पेडगावकर यांनी हे गाणे शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. 

आपला मराठीबाणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा हा 'हरिओम' येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे. या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे हे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘हरिओम’च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरची धुरा राज सुरवडे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे निर्माता, कथाकार आणि अभिनेता हरिओम घाडगे म्हणतात, ''आजच्या युवा पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्याचा मानस हरिओम चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल ,अशी मी आशा करतो.''

https://youtu.be/MkASGCg0ePI


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...