Saturday, September 17, 2022

भाऊबळी’मध्ये झळकणार विनोदवीरांची फौज

 ‘भाऊबळी’मध्ये झळकणार विनोदवीरांची फौज 

५० हून अधिक कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज !!!

नेहमीच सर्वोत्तम मनोरंजनाचा आशय देणारे झी स्टुडिओज पुन्हा एक दर्जेदार आणि जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले असून समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा एक धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रासंगिक विनोदावर आधारित या चित्रपटाची खासियत म्हणजे, ५० हून अधिक नामवंत कलाकारांची तगडी फौज या चित्रपटाला लाभली असून प्रेक्षकांना विनोदाचा तुफान धमाका यात अनुभवायला मिळणार हे नक्की! किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, रेशम टिपणीस, प्रियदर्शिनी इंदलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, तुषार घाडीगावकर, शार्दूल सराफ, सचिन भिलारे, आनंद अलकुंटे, विश्वास सोहनी, रसिका आगाशे, विजय केंकरे, श्रीकर पित्रे असे

 चित्रपटसृष्टीतील कसलेले, लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खदखदून हसवण्याकरता येणार असून आपल्या भन्नाट विनोदशैलीने प्रत्येक व्यक्तिरेखा काही नवीन शिकवण देऊन जाईल. वास्तववादी असणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर आहेत. 

दोन वेगळ्या जीवनशैलीचे लोक जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यात होणारे मतभेद, कलह, संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी सूड भावना या चित्रपटात अगदी हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना  १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात नक्कीच यशस्वी होईल!



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Famous actress Surbhi Hande will be seen in Anushree Films' new project, shared photos from the shoot and gave information

  Anushree Films' first project of the new year completes its muhurat, shooting begins with actress Surbhi Actress Surbhi Hande, who has...