Friday, September 2, 2022

पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या. 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.


 'ज्ञानेश्वर माउलीमालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

 

                    सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउलीया मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहेमाउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्काररेड्यामुखी वेदश्रीसार्थ ज्ञानेश्वरीविश्वरूप दर्शनपसायदान हे सार काही प्रेक्षकांना विशेष भावलंअलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेतमालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहेमाउलीत्यांची भावंडंइतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलंपण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यांत आणखी एका संताची एंट्री होणार आहे.


                  या संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झालीमाउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहेसंत चोखामेळा या पात्राची मालिकेत एंट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहेपतितांना तारणारे  उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जातेया भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहेअंगावर गोंघडीचे शिवलेले वस्त्रहातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेलत्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईलयांत शंकाच नाहीत्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहेविठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माउली यांचे संबंध नेमके कसे होते हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.

          संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखामेळा यांचा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!

  What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!   Eating healthy and nutritious food can...