Thursday, September 29, 2022

भारतीय रत्न-आभूषण उद्योगात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा पुरस्कार

 'राष्ट्रीय ज्वेलरी पुरस्कार २०२२'

टी.एस.कल्याणरामन यांना 'अनमोल रत्न' सन्मान प्रदान, भारतीय रत्न-आभूषण उद्योगात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा पुरस्कार

ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. टी एस कल्याणरामन यांना ‘अखिल भारतीय जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलच्या २०२२ च्या राष्ट्रीय ज्वेलरी अवॉर्ड्स’ मध्ये 'अनमोल रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यवसायाप्रती असलेला त्यांचा अग्रगण्य दृष्टिकोन आणि कल्याण ज्वेलर्स या ब्रँडला नव्या उंचीवर घेऊन जाणारा महत्त्वाकांक्षी उद्योजकीय भाव यासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

श्री. टी एस कल्याणरामन यांच्या वतीने कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री राजेश कल्याणरामन यांनी जीजेसीचे अध्यक्ष श्री.आशीष पेठे, जीजेसीचे उपाध्यक्ष श्री. साईयाम मेहरा, जीजेसीचे संयोजक श्री. नितीन खंडेलवाल आणि श्री. अशोक मिनावाला, श्री हरेश सोनी, श्री. श्रीधर गुर्रम, श्री. नीलेश शोभावत आणि श्री सुनील पोतदार या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. जीजेसीच्या राष्ट्रीय ज्वेलरी अवॉर्ड्सच्या ११ व्या सत्रात अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिच्या हस्ते हा सत्कार समारंभ करण्यात आला.

श्री.राजेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले, "माझ्या वडिलांच्या वतीने हा विशेष सन्मान स्वीकारताना मला आनंद होत आहे आणि तो मी कल्याण ज्वेलर्सच्या कुटुंबाला समर्पित करू इच्छितो. त्यांच्या अतुलनीय समर्पणाने ब्रँडच्या यशाची नोंद होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीची प्रादेशिक ते जागतिक स्तरावर झालेली प्रगती विश्वासाच्या मूलभूत मूल्याच्या पायावर होती आणि हा विश्वासच आमच्या ग्राहकांमध्ये दिसून येत आहे. सातत्यपूर्ण संवाद साधत ब्रँड कम्युनिकेशनने नेहमीच प्रत्येक प्रदेशातील ग्राहकांवर तेथील स्थानिक संस्कृतीशी संबंधित अभिरुची आणि निवडींवर लक्ष केंद्रित केले आहे. मला विश्वास आहे की या दृष्टिकोनामुळेच आपल्या देशात तसेच परदेशातील बाजारपेठांमध्येही आम्ही यशस्वी होऊ शकलो आहोत."

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...