Thursday, November 17, 2022

बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी कल्याणची लिमिटेड एडिशन ज्वेलरी कल्याण ज्वेलर्सची नवी श्रेणी मुलांनी विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड असेल

बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी कल्याणची लिमिटेड एडिशन ज्वेलरी

कल्याण ज्वेलर्सची नवी श्रेणी मुलांनी विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड असेल 

 बालदिनाचे औचित्य साधून कल्याण ज्वेलर्सने मुलांसाठी लिमिटेड एडिशन ज्वेलरीची घोषणा केली आहे. एनिमेटेड कार्टून कॅरेक्टर्सपासून निसर्गातील विविध घटकांपर्यंत अनेक गोष्टी या कलेक्शनची प्रेरणा बनल्या आहेत. हे दागिने खूपच अनोखे आणि वजनाला हलके असल्याने मुलांना अगदी सहज घालता येतील असे आहेत. लहान मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली कल्याण ज्वेलर्सची ही नवी श्रेणी मुलांनी विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड आणण्यात नक्कीच खूप मोठे योगदान देईल.

बालदिनाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी कल्याण ज्वेलर्सने सर्व दागिन्यांच्या खरेदीवर २५% पर्यंत सूट आणि स्टोन मूल्यावर सरसकट २५% सूट जाहीर केली संपूर्ण भारतातील सर्व कल्याण ज्वेलर्स शोरूम्समध्ये १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या अनोख्या ऑफर्सचा लाभ घेता येईल. 

 

लहान मुलांना सहज घालता येतील असे हे शानदार आणि सुंदर दागिने खूप लोकप्रिय होतील जाणून घेऊयात:-

 १)   बालपणीच्या स्वप्नील वृत्तींना साजेसे हे कानातले, तुमच्या छोट्या परीराणीसाठी हे परफेक्ट गिफ्ट आहे. हे कानातले १८ कॅरेट सोन्यात बनवले गेले आहेत. प्रत्येक बारकाव्यावर विशेष लक्ष देऊन अतिशय नाजूकपणे घडवण्यात आलेल्या या कानातल्यांमध्ये फिरोझी रंगाच्या फुलपाखरांचे सोनेरी पंख एक सुंदर लुक मिळवून देतात.


२)   प्राचीन काळापासून मुलांना घातल्या जाणाऱ्या नजर बट्टूला मॉडर्न ट्विस्ट देऊन कल्याण ज्वेलर्सने हे ब्रेसलेट तयार केले आहे, जे तुमच्या बाळाला वाईट नजर लागू देणार नाही. नकारात्मकतेपासून सुरक्षेसाठी घातल्या जाणाऱ्या काळ्या मण्यांची एक सुंदर माळ आणि त्यासोबत एक एव्हील आय अम्युलेट देखील जोडण्यात आले आहे.


३)   प्रत्येक राजकुमारीचा राजमुकुट तर असतोच. तुमच्या छोट्या महाराणीला साजेसा हा शाही मुकुट तिच्याकडे असायलाच हवा. प्लॅटिनमचे हार्ट, मधोमध एक दिमाखदार हिरा आणि भोवती उभे असलेले तीन हिरे असे हे नाजूक पेंडंट तिला एक शानदार लुक प्रदान करेल.


४)   मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करवून देण्याची एक चांगली पद्धत म्हणजे दागिने. मध्ये दोन टीयर ड्रॉप्स हेलोसोबत हे शानदार ब्रेसलेट कोणत्याही कपड्यांवर खूप छान दिसते. हिरे या संपूर्ण डिझाईनचे वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळेच तुमच्या छोट्या परीची चमक अजून जास्त खुलून येईल. साधीशी पण सुंदर अंगठी सोबत असेल तर हा संपूर्ण लुक खूप छान दिसेल.


५)   निरागसता हे मुलांचे सौंदर्य असते. हा दागिना मुलांची निरागसता दर्शवतो. अतिशय अनोख्या डिझाईनचा हा नेकलेस सोन्याच्या मोत्यांपासून घडवण्यात आला आहे, यामधील फुलांची ट्रिनिटी खूप छान आहे. फुलांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले हे डिझाईन आणि पारंपरिक भारतीय कंगन एक परिपूर्ण सुंदर लुक प्रदान करतात

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...