Tuesday, November 21, 2023

मीरा होणार मल्हारची राणी.

मीराला सापडला तिचा राजकुमार.

'राणी मी होणारमालिकेत उडणार लग्नाचा बारराणी मी होणार सोमवार  रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 


                          प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतंआपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाटसगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं हे स्वप्नं पूर्ण झालंय बरं.. विषय विचार करायला लावणारा असला तरीही जर त्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रत्यक्षातल्या एखाद्याने घेतली तर.. असा एखादा जो रोज आपल्यासोबत आहे अगदी सुख-दुःखाचा साथीदारचज्याला  सांगता आपल्या मनातलं उमगतंजो आपल्या स्वप्नांसाठी कायम पाठीशी उभा राहतोअसाच एखादा.. दुसरा-तिसरा कुणी नाही तर आपला मल्हार असून मीराच्या स्वप्नांना उमेद देणारा मल्हारच खऱ्या अर्थाने मीराचा राजकुमार आहे. 'राणी मी होणारमालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

आपल्या आयुष्याचा जोडीदार श्रीमंत असावा या विचारांच्या मीराला मल्हारच्या तिच्यावरील प्रेमाची साधी कल्पना देखील नाही आहेमैत्रीपलीकडे झुकेलेलं हे सुंदर नातं आता एका अशा बंधनात अडकणार आहे ज्याचा दोर अगदी त्यांच्या घट्ट मैत्रीइतकाच मजबूत असणार आहेतुमच्या लक्षात आलं असणारच आहे ते म्हणजे मीरा आणि मल्हारची लगीनगाठ बांधली जाणार आहेमल्हारला तर त्याची राणी भेटलीये पण मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?, मल्हार मीराला आपल्या प्रेमाची कबुली कशी देईल?, एक हक्काचा मित्र की आयुष्यभराचा जोडीदार यापैकी कुठल्या नात्यात मीरा मल्हारला स्विकारेलकी हा हक्काचा मित्रच आयुष्यभराचा जिवलग जोडीदार होईल?, लग्नानंतर या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रूपांतर अतूट प्रेमात होईल काहे आणि असे असंख्य प्रश्न सध्या तुम्हा-आम्हाला पडत आहेत आणि त्याची उत्तरं मात्र 'राणी मी होणारया मालिकेच्या पुढच्या भागांत आपल्याला पाहायला मिळणार आहेत तेव्हा सोनी मराठी पाहणं विसरायचं नाही.



 

                        सुखी संसाराचं चित्र रेखाटण्यासाठी श्रीमंती फक्त आणि फक्त निर्व्याज प्रेमाची हवी हे सांगणारी सोनी मराठीवरील 'राणी मी होणारही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहेपैसा आणि स्टेट्स यांच्या मायाजाळात अडकलेल्या पिढीला एक चांगला संदेश या मालिकेद्वारा सोनी मराठी देत असून लवकरच मीरा आणि मल्हारच्या एकमेकांवरील प्रेमाने ते सिद्ध देखिल करून दाखवणार आहेत हे विशेष उल्लेखनीय आहेमीराचा राजकुमार आणि मल्हारच्या राणीची ही अनोखी प्रेम कहानी असणारी 'राणी मी होणारही मालिका पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त सोनी मराठीवर सोम ते शनिरात्री .०० वा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...