Tuesday, November 21, 2023

सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन सादर करत आहे ‘हाथ धोना कूल है’

 सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन सादर करत आहे ‘हाथ धोना कूल है’

रॅपर एमिवे बन्ताई करणार हात धुणे अधिक कुल, धारावी ड्रीम प्रोजेक्ट सोबत

राष्ट्रीय, ऑक्टोबर २०२३-  आपले हात सातत्याने धुवून स्वच्छ ठेवणे ही गोष्ट तरुणाईसाठी महत्त्वपूर्ण आणि कूल व्हावी यासाठी सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन तर्फे दि धारावी ड्रीम प्रोजेक्ट मधील कुशल मुलांना एकत्र आणून प्रसिध्द रॅप कलाकार एमिवे बन्ताई याच्या समवेत ‘हाथ धोना कुल है’ या ॲन्थमची निर्मिती करुन हिप हॉप संस्कृती च्या माध्यमातून भारतातील लहान मुलांमध्ये हातांच्या स्वच्छतेचा प्रसार करण्यात येणार आहे.  

सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन ने प्रथमच दि धारावी ड्रीम प्रोजेक्ट बरोबर सहकार्य करुन समाजातील मुलांना बदलाचा सदिच्छादूत बनण्यास प्रोत्साहन देऊन हात धुण्याच्या जगन्मान्य पध्दतीचा विकास करुन आजारांपासून मुक्ती मिळण्यास प्रोत्साहन दिले आहे.  दि धारावी ड्रीम प्रोजेक्ट आफ्टर स्कूल ऑफ हिप हॉप ही मुंबईतील एक सामाजिक संस्था असून विविध शैक्षणिक कार्यक्रम, मार्गदर्शन आणि समाजाला एकत्र आणून मुंबईतील धारावी मध्ये राहणार्‍या मुलांना सहकार्य या संस्थेकडून केले जाते.

आजमितीस धारावी ही सांस्कृतिक दृष्ट्या वैभवशाली अशी हिप हॉपची नगरी म्हटली जाते. या संगीताची प्रसिध्दी ही त्यांच्या रोजच्या जीवनातून पुढे येत असते.

सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशनच्या माध्यमातून नियमित हात धुण्याचा संदेश हा केवळ माहितीपूर्ण तर आहेच पण त्याच बरोबर तरुणाईसाठी प्रोत्साहक ही आहे.  सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन तर्फे सिग्नेचर अशी हिप हॉपची हात चोळण्याची क्रिया ही सुरु असून जगभरांतील रॅप कलाकारांकडून वापरली जाते आणि हेच हातांच्या स्वच्छतेचे निशाण आहे.  ‘हाथ धोना कूल है’ ही मोहिम हिपहॉपच्या सांस्कृतिक नाविन्याचे महत्त्व अधोरेखित करत असून याच बरोबर तरुणांमध्ये कूल प्रसार करुन अधिक चांगल्या प्रकारे हातांच्या स्वच्छतेचा प्रसारही करत आहे,  त्याच बरोबर या पारंपारिक कामाला एक आकर्षक आणि चांगली गोष्ट म्हणून परिभाषित करत आहे. 



एमिवे बन्ताई हा किंग ऑफ स्ट्रीट्स म्हणून प्रसिध्द आहे आणि त्याने सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन साठी ही हॅन्डवॉश अँथम लिहिली असून त्याला संगीतही दिले आहे.  तो त्याच्या अनोख्या स्टाईल आणि गाण्यांसाठी प्रसिध्द आहे.  त्याच्या अगदी रॉ आणि अनोख्या अशा स्टाईलचा  भारतात वेगळा असा चाहता वर्ग आहे. 

सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन तर्फे आजच्या तरुणाई बरोबर  नाविन्यपूर्ण संवाद साधत असतांनाच तुम्हाला आता हाथ धोना कूल है चा हा ताजा ट्रॅक एमिवे बन्ताई आणि दि धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे.

 

आयटीसी लिमिटेड च्या पर्सनल केअर प्रॉडक्ट्स बिझनेस चे डिव्हिजनल चीफ एक्झिक्युटिव्ह समीर सत्पती यांनी सांगितले “ एकूण आरोग्याची निगा राखण्यात हॅन्डवॉशचे मोठे योगदान आहे.  आयटीसी सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन ने आघाडीवर राहून हातांच्या स्वच्छतेची सवय लावून नाविन्यपूर्ण पध्दतीने संभाषण करत हा बदल करण्यासाठी उत्पादनाची संकल्पना आणली आहे.  हाथ धोना कूल है अँथम मुळे सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन आजच्या तरुणाईतील सांस्कृतिक तथ्य समोर आणत आहे जेणेकरुन सोप्या पण जगभरांतील रॅप स्टार्स वापरत असलेल्या हात धुण्याच्या स्टाईलचा आम्ही प्रसार करत आहोत. ही एक नक्कीच अनोखी संकल्पना असून यामुळे हात धुणे ही एक चांगला विधी बनला आहे.”

आयकॉनिक रॅप स्टार एमिवे बन्ताई म्हणतो “ ही एक सुंदर संकल्पना आहे, मी कधीच असा विचार केला नव्हता की हात घासण्याची रॅपमधील स्टाईलचा इतका चांगला अर्थ असेल.  सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन बरोबर सहकार्य करुन इतके चांगले अजोड काम केल्या बद्दल मी उत्साही आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जेंव्हा तुम्ही हे बघाल तेंव्हा सुध्दा हात धुण्याशी पुन्हा जोडले जाल.  सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन ने माझी निवड केली आणि अगदी छोट्या पण महत्त्वाच्या आरोग्य संदेश -हात धुण्यासाठी माझी निवड केली.  तर मग आता पहा आणि #HandwashLegends च्या तालावर ठेका धरा! 

 

दि धारावी ड्रीम प्रोजेक्ट टीम च्या मते “ हातांची स्वच्छता ही सर्व वयोगटांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक असते.  या प्रकल्पाचा भाग बनून जागतिक महत्त्वाच्या प्रकल्पात भाग घेऊन एमिवे सह आमचा दृष्टिकोन पुढे आणत रॅप अँथमच्या तालावर सॅव्हलॉन स्वस्थ इंडिया मिशन बरोबर काम करतांना आंम्ही आनंदी आहोत.  हाथ धोना ट्रूली कूल है !”

 


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...