“इतिहास इबलिसचं घडवतात”, दिग्दर्शक राहुल चौधरी यांच्या 'इबलिस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा
एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली भन्नाट गाठ! 'इबलीस'चा ट्रेलर आला तुमच्या भेटीला
‘इबलिस’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पार पडला
बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.
गायिका सावनी रविंद्र यांनी या चित्रपटातील मिरची सिंगापूरची हे गाण गायल आहे. त्या चित्रपटाविषयी आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगविषयी म्हणाल्या, “खरंतर मी दिग्दर्शक राहुल चौधरी यांचे आभार मानते की त्यांनी मला या चित्रपटातील गाणं गायची संधी दिली. मी आजवर शास्त्रीय संगीत आणि रोमँटिक गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच मी मिरची सिंगापूरची हे आयटम गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं मी ७ वर्षापूर्वी गायलं होतं परंतु कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाही. आता ७ वर्षानंतर हा चित्रपट येत आहे म्हणून मीच राहुल सरांना सांगून हे गाणं नुकतंच पुन्हा फ्रेश रेकॉर्ड केल आहे. तुम्ही हे गाणं प्राची म्युझिक या युट्यूब चॅनेलवर नक्की बघा. आणि येत्या २० जूनला इबलिस हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”
दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी 'इबलिस' चित्रपटाविषयी सांगतात, “'इबलिस' हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ - २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. नुकतच रिलीज़ झालेल्या इबलिस चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”


No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST