Wednesday, June 18, 2025

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात

 

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात 

सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सु झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड  पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर  शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला ‘अल्याड पल्याड’ २७ जूनपासून असं म्हटलं आहे.  

‘अल्या पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा ही निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातर हा चित्रपट २७ जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शन प्रीतम एसके पाटील यांनी केले आहे.

मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर,भाग्यम जैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळीच रंगत आणली होती. या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले होते. आता  हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे.   

 
याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले की, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली  तेव्हा  विचारही केला नव्हता की, या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर  घेतील. आम्ही प्रामाणिकपणे  काम केलं त्याचं यश आम्हांला मिळालं. आज पुन्हा एकदा हा  चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम  मिळेल याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...