Tuesday, June 24, 2025

“आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केली.

“आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केली.

जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत मराठीतील पहिलं  AI महाबालनाट्य “आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केली. बालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलं. हसत, गात, नाचत, बागडत आताच्या पिढीत मराठीची गोडी निर्माण केली. निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसह ११ कलाकारांची मांदियाळी भरलेली दिसते. “आजच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून त्यांच्या हातात पुस्तकं पुन्हा येऊ घालत आहेत ते या नाटकामुळे” अशी अनेक मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली. 

या नाटकामुळे ह्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांचा खप सुद्धा वाढल्याची माहिती समोर आली. परंतु आताच्या घडामोडींना पाहता आज्जीने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ही मराठीची गोडी निर्माण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मराठीच सक्तीची नाही ही घटना अत्यंत दुःखद आहे. एकीकडे मराठीला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा आणि दुसरीकडे तिला तिच्याच माहेरी बेदखल करण्याची प्रक्रिया... कुठेतरी आपण मराठी भाषिक म्हणून एक पाऊल उचललायला हवं. पुढील पिढीला म मोबाईलचा सोडून म मराठीचा गिरवता यावा म्हणूनच आता आज्जी निघाली आहे शाळेत. दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी  दु. ४ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे  “आज्जी बाई जोरात” या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.


 या प्रयोगासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज्जी घराघरात तर पोहचलीच आहे आता आज्जी सुद्धा नातवंडांसोबत निघाली आहे शाळेत. तुम्ही सुद्धा मराठीच्या ह्या सफरीत सहभागी व्हा आणि म मराठीचा गिरवूया...

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...