Thursday, June 19, 2025

सह्याद्री देवराई चे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे माईमीडिया च्या"मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५" ने सन्मानित!

 सह्याद्री देवराई चे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे माईमीडिया च्या"मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५" ने सन्मानित!

मराठी, हिंदी, तेलुगु, तमीळ, कन्नड, गुजराती, भोजपुरी, मल्याळी, इंग्रजी... आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्यांपैकी एक सयाजी शिंदे!

रुपेरी पडद्यावर खलनायक ताकदीनं रंगवणारे पण  प्रत्यक्ष आयुष्यात  नायक म्हणून त्यांचे काम अधिक महत्त्वाचं ! पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात करणारे राज्यभरात अनेक वृक्षारोपण मोहिमा राबवल्या, स्वतः २५ हजारांहून अधिक झाडं लावली , त्यामुळे अनेक उजाड माळरानं  वृक्षवेलींनी बहरली.पर्यावरण रक्षणासाठीचे हे योगदान मोलाचे!

सह्याद्री देवराई च्या रुपाने  एक सक्षम निसर्गाचं विश्व उभं करणारे..झाड़ कशी लावावी ते वाचवावी यासोबत महाराष्ट्रात कोणती झाड़ लावली तर निसर्ग संवर्धन होऊन मानवहित साधलं जाईल याचं भान व आपला अभ्यास व झपाटून काम करणारा अवलिया कलावंत सयाजी शिंदे यांना या अनमोल योगदानासाठी माईमीडिया24 आयोजित, प्लँनेट मराठी च्या सहकार्याने"मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया' (माई)च्या ' मीडिया एक्सलन्स एवाँर्ड२०२५' ने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटाच्या शुटिंग मधे व्यस्त असल्याने ते पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत आणि म्हणूनच त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कार्यक्षेत्राचे ठिकाणी जाऊन प्रदान करण्यात आला.

माई मीडिया२४ च्या संस्थापक मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर, कार्याध्यक्ष सचिन चिटणीस, कोषाध्यक्ष व मुंबई जिल्हा अध्यक्ष चेतन काशीकर , मुंंबई शहर संघटन समन्वयक गणेश तळेकर, मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे व  कार्यकारिणी सदस्य व लोककला अभ्यासक  सुरज खरटकमल यांनी  प्रदान केला.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...