इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार लोकप्रिय पार्श्वगायिका देवकी पंडित!
पाहा, सोमवार - बुधवार, रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगत चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता महाराष्ट्राला मिळणार आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' ही टॅगलाईन असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्न घडवतो आहे. सध्या महाराष्ट्राला टॉप ६ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहे. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रिय गायिका देवकी पंडित येणार आहेत.
देवकी पंडित यांचं मार्गदर्शन, आणि स्पर्धकांची सुरेल गाणी ऐकण्यासाठी पाहायला विसरु नका 28, 29 आणि 30 मार्च रोजी रात्री 9 वाजता 'इंडियन आयडल मराठी' फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
.jpeg)





