Saturday, September 28, 2019

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार जिंकत गोव्याची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार जिंकत गोव्याची चमकदार कामगिरी

प्रेस रीलीज

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार जिंकत गोव्याची चमकदार कामगिरी
·        साहस पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य म्हणून जाहीर

·        पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास करणाऱ्या सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा
पणजी27 सप्टेंबर – गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) गेल्या 4- 5 वर्षांत गोव्याचे उच्चभ्रू दर्जाचे साहस पर्यटनस्थळ म्हणून विकास केला असून राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2019 मध्ये गोवा टुरिझमने नुकतेच साहसी पर्यटनासाठीच्या सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळवला आहे.
या निमित्ताने गोवा टुरिझमला आणखी एक मान मिळाला असून राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास साधणारे राज्य (उर्वरित भारत) हा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळवला आहे. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमधील पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास साधणारे राज्य या पुरस्काराची हॅटट्रिक गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधानव्या पर्यटन सेवा आणि उपक्रम यांच्यांमुळे शक्य झाली आहे.
जागतिक पर्यटन दिनी देशाच्या राजधानीत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री. वेंकटेश नायडू यांनी माननीय उप मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीगोवा सरकार, श्री. मनोहर आजगांवकरअध्यक्ष जीटीडीसीश्री. दयानंद सोपटेपर्यटन सचिवगोवा सरकारश्री. जे अशोक कुमार आणि व्यवस्थापकीय संचालकजीटीडीसीश्री. निखिल देसाई यांना प्रदान केला. यावेळेस राज्याचे पर्यटन केंद्रीय मंत्री श्री. प्रल्हाद सिंग पटेल हे ही उपस्थित होते.
एनटीए पुरस्कारांची सुरुवात 1990 मध्ये करण्यात आली व ते राज्य सरकार/युटी आणि इतर विविध पर्यटन संघटनांना पर्यटनहॉस्पिटॅलिटी व संबंधित क्षेत्रातील चांगल्या कामगिरीसाठी दिले जातात. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी निकोप स्पर्धा तयार करण्याच्या हेतूने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती.
साहसी पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य – गेल्या 4- 5 वर्षांत गोवा टुरिझमने गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने विविध प्रकारच्या नव्या पर्यटन सेवा आणि साहस उपक्रम सुरू केले असून त्यात स्कुबा डायव्हिंगहॉट एयर बलून राइड्सहॉप ऑन हॉप ऑफ लक्झरी डबल डेकर बस टुर्सबंजी जंपिंगसी राफ्टिंग, इलेक्ट्रिक बायसिकल टुर्सव्हाइट वॉटर राफ्टिंग आणि पावसाळ्यात इको- ट्रेकिंग, सायकलिंग टुर्सकयाकिंगऑफ रोडिंगमोटर क्रॉस इत्यादीचा त्यात समावेश आहे. गोव्याला 105 किमीचा किनारा लाभाल असून तो ही साहसी वॉटर स्पोर्ट्ससाठी लोकप्रिय आहे. या सर्व उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी गोव्याकडे आकर्षित करण्यास मदत झाली आहे. गेल्या काही वर्षांत साहस पर्यटनानाने गोव्याला देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक मिळवून दिलेचशिवाय साहस पर्यटन उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी राज्याला भेट देणाऱ्य पर्यटकांचा वास्तव्यकाळही वाढला आहे. जीटीडीसीने इतर पर्यटन उपक्रमही लाँच केले असून त्यात राज भवन दर्शन सहलतिरुपती सहल त्याचप्रमाणे हेरिटेज वॉक्सबर्ड ट्रेल्सबोट क्रुझेसपर्यटनाशी संबंधित क्रीडा उपक्रम यांना पाठिंबा देणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. साहस पर्यटनाबरोबरच लोकप्रियता मिळवणाऱ्या इतर क्षेत्रांमध्ये फिल्म अँड फॅशन टुरिझमवेडिंग टुरिझमवेलनेस टुरिझममाइस टुरिझमइको- टुरिझम आणि हिंटरलँड टुरिझम यांचा समावेश आहे.

पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास – स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत गोव्याला केंद्रीय सरकारकडून सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यामुळे राज्यातील एकंदर पर्यटन विकासाला मोठी चालना मिळाली आहे. त्यात पायाभूत सुविधांचा विकासपर्यटन प्रकल्पांची सुरुवातपर्यटन उत्पादने आणि सेवांचे लाँच, सुरक्षिततेसंदर्भातील उपक्रमस्वच्छताधोरणेविपणन आणि प्रसारवेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम इत्यादींचा समावेश आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करण्यासाठी गोवा टुरिझमने जीटीडीसीच्या माध्यमातून गोवा माइल्स ही अप आधारित पहिली टॅक्सी सेवा लाँच केली आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यांची सेवाजीवरक्षक सेवापार्किंगसार्वजनिक उपयुक्तता सेवा उदा. शौचालयेकपडे बदलण्यासाठी खोल्यालॉकर्सपर्यटक माहिती केंद्रेपर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी चांगला प्रवेशसुशोभीकरणसीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा व आणखी बऱ्याच सोयीसुविधा लाँच करण्यात आल्या आहेत. पर्यटनाशी संबंधित मोठ्या प्रकल्पांपैकी मोर्जरीमायेंकंडोली-कलंगुटबागा यांचे कामसुरू झाले असून पाटो येथे आधुनिक कन्व्हेंशन केंद्रहॉटेल मॅनेजमेंट संस्था तसेच अग्वादा तुरुंग पर्यंटन अशा प्रकल्पांवर काम सुरू आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्तीविषयी माननीय उप मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीगोवा सरकारश्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळवत राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मंचावर गोव्याने मिळवलेल्या पुरस्कारांची संख्या आणखी वर नेण्याचा हा क्षण  खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे. सलग तिसऱ्यांदा राज्याचा पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास करणारे राज्य म्हणून दखल घेतली गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या यशासाठी एकत्रितपणे योगदान देणारा प्रत्येक भागधारकअधिकारी आणि टीम सदस्याचे मी या निमित्ताने आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विशेषत्वाने उल्लेख करायला हवाकारण त्यांनी कायमच राज्याच्या पर्यटन क्षेत्राला संपूर्ण पाठिंबा दिला. जीटीडीसीचे अद्यक्ष श्री. दयानंद सोपटे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आणि राज्यातील पर्यटन विकासामध्ये महत्त्वाचा वाटा उचलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे पुरस्कारांविषयी म्हणाले, राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार अतिशय प्रतिष्ठित आहेत आणि राज्याचा आघाडीचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी गोवा सरकार घेत असलेल्या मेहनतीची दखल घेतली गेल्याचा मला आनंद वाटतो. साहस पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य म्हणून दिलेला पुरस्कार आमच्या शिरपेचातील मानाचा तुरा असून त्यामुळे अशाप्रकारे नवे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम लाँच करण्यासाठी जीटीडीसीला चालना मिळेल. मी माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतमाननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकरजीटीडीसीचे संचालक मंडळसर्व अधिकारीइंजिनियर्स आणि सर्व नियोजन व प्रकल्प साध्य करण्यासाठी मदत करणाऱ्या भागिदारांचे मी आभार मानतो.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...