Wednesday, September 18, 2019

Neena Kulkarni's surprise entry in 'AB Aani CD'

Neena Kulkarni's surprise entry in 'AB Aani CD'

AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी  यांची सरप्राईज एण्ट्री
OR
नीना कुळकर्णी  यांनी सोशल मिडीयावर शेअर केला ‘AB आणि CD’ मधील सरप्राईज एण्ट्रीचा फोटो
नीना कुळकर्णी  हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. आसू आणि हसू या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्री या नात्याने ते प्रेक्षकवर्गापर्यंत पोहचल्या जरुर पण आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक सरप्राईज प्रेक्षकांना दिले आहे.
नीना कुळकर्णी  यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत हे सर्वांना माहित आहे, पण नीना कुळकर्णी  पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत हे अनेकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल. पण त्या कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्रीच्या मागे नेमके कारण काययाची उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहेत.
अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्सकेव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’ चे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता प्रतिक्षा केवळ या सिनेमाची झलक पाहण्याची.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...