Friday, September 13, 2019

बिग बॉस फायनलिस्ट आरोह वेलणकरने पुढे केला पुरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले योगदान

बिग बॉस फायनलिस्ट आरोह वेलणकरने पुढे केला पुरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले योगदान

बिग बॉस फायनलिस्ट आरोह वेलणकरने पुढे केला पुरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले योगदान

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायनलिस्ट,  अभिनेता आरोह वेलणकरने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा मदतनिधी दिला. मुख्यमत्र्यांच्या कार्यालयातून आरोहच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी ट्विटही करण्यात आले.

'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर ह्याविषयी सांगतो, “माझा सामाजिक कार्य करण्याकडे पूर्वीपासूनच कल असल्याने मी अशी मदत नेहमी करत असतो. त्याविषयी बोलायला मला जास्त आवडत नाही. पण ह्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच ह्यविषयी ट्विट केले आहे.”

तो पूढे म्हणतो, “जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढे मोठे संकंट कोसळले होते. बाहेर आल्यावर मला ह्या गोष्टीची जाणीव झाली. ह्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा ही इच्छा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला,

आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो. सूत्रांच्या अनुसार, आरोहच्या ह्या उपक्रमामूळे त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...