Saturday, September 28, 2019

Press Note- २ ऑक्टोबरला ‘बिग मॅजिक’ चॅनेलवर रंगणार अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाऊंडेशन’चा ‘मिट्टी के सितारे २०१९’ मंचावरील सोहळा

Press Note- २ ऑक्टोबरला ‘बिग मॅजिक’ चॅनेलवर रंगणार अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाऊंडेशन’चा ‘मिट्टी के सितारे २०१९’ मंचावरील सोहळा

२ ऑक्टोबरला ‘बिग मॅजिक’ चॅनेलवर रंगणार अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाऊंडेशन’चा ‘मिट्टी के सितारे २०१९’ मंचावरील सोहळा

प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असतात आणि प्रत्येकालाच त्या कला सादर करण्यासाठी एखादी संधी किंवा मंच मिळतोच असं नाही. पण ज्यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘दिव्याज फाऊंडेशन’च्या वतीने एक अनोखा मंच तयार केला होता ज्याचे नाव होते ‘मिट्टी के सितारे’.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून अनेक विद्यार्थांनी ‘मिट्टी के सितारे’ या उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या आणि ऑडिशन्समधून निवडून आलेल्या विद्यार्थांना शंकर महादेवन अकादमीमध्ये प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. यासर्व प्रक्रियेनंतर ‘मिट्टी के सितारे’ची अंतिम फेरी रंगली होती. ‘मिट्टी के सितारे’च्या अंतिम फेरी सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी या मंचाचे आणि स्पर्धकांचे मनापासून कौतुक केले. आता हा सोहळा प्रेक्षकांना टेलिव्हिजन चॅनेलवर अनुभवयाला मिळणार आहे.

येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना ‘दिव्याज फाऊंडेशन’ यांच्या वतीने एमपॉवर प्रस्तुत ‘मिट्टी के सितारे २०१९’ ‘बिग मॅजिक’ या चॅनेलवर दुपारी १२ वाजता पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...