'आऊट ऑफ लव्ह"
हॉटस्टार स्पेशल्स प्रस्तुत विश्वासघाताच्या गडद वास्तविकतेला दाखवणारा शो
~ तुमचा विश्वासघात झाला तर तुम्ही क्षमा कराल, सर्वकाही विसरून जाल की त्यासाठी लढाल?
~ बीबीसी स्टुडिओज इंडियाची निर्मिती आणि रसिका दुगल व पुरब कोहली अभिनीत ही रोमांचक ड्रामा सिरीज पाहा २२ नोव्हेंबर २०१९ पासून हॉटस्टार व्हीआयपीवर ~
मुंबई, १५ नोव्हेंबर २०१९: 'हॅप्पीली नेव्हर आफ्टर' हे तीन शब्द डॉ. मीरा कपूरच्या जीवनाचा सारांश सांगतात. तिच्या जीवनात सर्वकाही सुरळीतपणे सुरू असते. पण एके दिवशी तिला समजते की, तिच्या पतीचे दुस-या स्त्रीसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. हॉटस्टार स्पेशल्स सादर करत आहे नवीन सिरीज 'आऊट ऑफ लव्ह'. ही रोमांचक ड्रामा सिरीज जटिल नात्यांमधून निर्माण होणा-या भावनिक व मानसिक दुविधेला सादर करते. या सिरीजमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आला आहे - तुमचा विश्वासघात झाला तर तुम्ही क्षमा कराल, सर्वकाही विसरून जाल की त्यासाठी लढाल?
अनेक पुरस्कार-प्राप्त शो 'डॉक्टर फॉस्टर'चे अधिकृत रूपांतर असलेली सिरीज 'आऊट ऑफ लव्ह' एका विवाहाच्या रोचक बाबीला सादर करते. या विवाहामध्ये विश्वासघात आहे, हृदयभंग आहे व धोका आहे. प्रमुख भूमिकेत प्रतिभावान रसिका दुगल व पुरब कोहली असलेल्या या शोमध्ये सोनी रझदान, हर्ष छाया, अंजन श्रीवास्तव आणि संघमित्र हितैषी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. बीबीसी स्टुडिओजची निर्मिती या शोचे दिग्दर्शन समीक्षकांद्वारे प्रशंसाप्राप्त चित्रपट निर्माते तिग्मांशू धुलिया व एजाज खान यांनी केले आहे. हा शो २२ नोव्हेंबर २०१९ रोजी फक्त हॉटस्टार व्हीआयपीवर सुरू होत आहे.
Quotes of Actors -
अभिनेत्री रसिका दुगल म्हणाली, ''हॉटस्टार स्पेशल्स प्रस्तुत 'आऊट ऑफ लव्ह' हा आधुनिक काळातील ड्रामा आहे. ही सिरीज विश्वासघाताच्या परिणामानंतरच्या जिव्हाळ्याचा क्षण व मानसिकतेला सादर करते. पॉप-संस्कृतीने नेहमी लोकं का फसवतात या गोष्टीवर फोकस केले आहे. तर 'आऊट ऑफ लव्ह' सिरीज त्यामधून उद्भवणारे भावनिक क्षोभ व दुविधेला सादर करते. ही सिरीज पात्रकेंद्रित कथानक आहे. मीराच्या वास्तविकतेला सादर करण्याचा माझ्यासाठी तो उत्तम अनुभव होता. तिच्या परिपूर्ण जीवनामध्ये अडथळे आल्यानंतर तिला योग्य निर्णय घेण्यामध्ये संघर्ष करावा लागतो, जेव्हा तिला समजते की तिचा नवरा तिला फसवत आहे.''
अभिनेता पुरब कोहली म्हणाला, ''विश्वासघात करणे हे आता सामान्य होत चालले आहे. तुम्ही देखील स्वत: यामध्ये अडकून जाऊ शकता. एक जोडीदार दुस-याला फसवत असताना ते जोडपे स्थितीचा कशाप्रकारे सामना करते हे अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे. यामध्ये फक्त वादविवादच होतात असे नाही, अनेकदा लोक नातं वाचवण्यासाठी क्षमा करतात किंवा सर्वकाही विसरून जातात. कधी-कधी या गोष्टी संपवण्यासाठी संघर्ष देखील करावा लागतो.''
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST