Thursday, November 21, 2019


योग इन्स्टिटयूट, योग द्वारे सर्वसमावेश!

त्रियांनी आणि वेरुषचक फौंडेशन च्या भागीदारी मध्ये योगा इन्स्टिटयूटनी परस्परसंवादी आणि सर्वसमावेशक असा एक कार्य दिव्यांगांसाठी हाथी घेतला आहे.
मुंबई, नोव्हेंबर २०, २०१९:  जगात सर्वात जुनी योग संस्था म्हणजे योगा इन्स्टिटयूट. आज योगा इन्स्टिटयूट मध्ये  दिव्यांगांसाठी पूर्ण दिवसाचा सत्र घेण्यात आला होता. 100 हुन अधिक दिव्यांग आपल्या पालकांसह उपस्थित होते. योगा इन्स्टिटयूट चे संचालक, डॉ हंसाजी योगेंद्र यांच्या मार्गदर्शना खाली विशेष तज्ञाद्वारे हे सत्र घेण्यात आले. दिव्यांगांसाठी कार्यरथ असलेले सुप्रसिद्ध एन जी त्रियांनी आणि वेरुषचक फौंडेशन यांनी, योगा इन्स्टिटयूट च्या या सत्रेंचे पुढाकार घेतले.
ह्या सत्रेंचे आधारस्तंभ योग असून ते वेगवेगळ्या करमणूकी द्वारे शिकवण्यात आले. ह्या वोर्कशॉप मध्ये स्थिरतेची व्यायाम, आरोग्यदाइ सवयी, रिसायकल आणि रियूस च्या कलाकृती, नृत्य आणि नाट्य, एकाग्रता वाढवायचे व्यायाम अशा ऍक्टिव्हिटीस समाविष्ट होते. ह्या कार्यशाळेचे मुख्य उद्देश्य म्हणजे दिव्यांगांचे आत्मविश्वास वाढवणे आणि अशे काही व्यायाम शिकवणे जे ते स्वतः दैनिक जीवनात समाविष्ट करू शकणार. फक्त दिव्यांग नसून त्यांच्या पालकांचे सुद्धा सेशन डॉ हंसाजींनी घेतले ज्यात त्यांचे सशक्तीकरण, ताण व्यवस्थापन, कौंसेल्लिंग वर मार्गदर्शन दिले.
डॉ हंसाजी यांचे म्हणणे , “ मागच्या  २२ वर्षात योगा इन्स्टिटयूट हे समाजाच्या वेगवेगळा स्थरांवर सतत काम करत आहे. योग हे सर्वसमावेशक असावे हेच  त्यांचे  दृष्टिकोन आहे.


सर्व समावेशक उपक्रमानविषयी बोलताना डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणाल्या
"योग संस्था ही योगाचे प्रतीक व भारताचा वारसा जपणारे आहेत. आमच्या संस्थेच्या मागील 22 वर्षांच्या आणि आता पूर्णत्वास आलेल्या 100 वर्षाच्या प्रवासासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहोत.
योगाद्वारे जागरूकता निर्माण करणाऱ्या आणि समावेश संधी चालवणाऱ्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. आणि निरोगीपणाचे कार्य या अनोख्या प्रयत्नातून सर्व समावेशक वातावरण निर्माण करण्याचे आमचे लक्ष आहे.
योगाच्या या अनोख्या प्रयत्नातून सर्वसमावेशक वातावरण व समाजातील भिन्न व्यक्तीच्या जीवनास स्पर्श करून त्यांनी केलेल्या कार्याशी प्रभावित होऊन या अनोख्या कार्याचा आम्हाला समाजामध्ये प्रसार करायचा आहे.


चांगली, सहज आणि सुखमय जीवनशैलीचा आणि कल्पित कल्पनांचा नाश होत चालला आहे.  म्हणून योगाद्वारे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम व योग्य मार्दर्शन करणारी कुटुंबे आम्ही निर्माण करीत आहोत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...