Thursday, October 13, 2022

केलॉग्सचे नवे 'प्रो-म्यूसली'

              केलॉग्सचे नवे 'प्रो-म्यूसली'

दिवसभराची प्रोटीन आवश्यकता २९% पूर्ण करेल 'प्रो-म्यूसली'  


 भारतातील आघाडीचे ब्रेकफास्ट सिरीयल उत्पादक केलॉग्सने 'केलॉग्स प्रो म्यूसली' बाजारपेठेत दाखल केले आहे. हाय प्रोटीन म्यूसली १००% प्लांट बेस्ड आहे, ज्यामुळे रेडी-टू-ईट सिरीयल कॅटेगरीमध्ये केलॉग्सचा उत्पादन पोर्टफोलिओ अधिकच मजबूत झाला आहे. सकाळच्या न्याहारीमध्ये प्रोटीनचा समावेश करण्याचा हा स्वादिष्ट, परिपूर्ण व एक सोपा मार्ग आहे. २०० मिली दुधासोबत केलॉग्स प्रो म्यूसलीचे एक सर्व्हिंग एका वयस्क व्यक्तीची (बैठे काम करणाऱ्या महिलेची) दिवसभराची प्रोटीन आवश्यकता २९% पर्यंत पूर्ण करते.


केलॉग्स प्रो म्यूसली हे केलॉग्स म्यूसली पोर्टफोलिओमधील अतिशय प्रभावी श्रेणीमध्ये सादर करण्यात आलेले नवीन उत्पादन आहे. या श्रेणीमध्ये २०% नट्स डिलाईटसह केलॉग्स म्यूसली, २१% फ्रुट, नट व सीड्ससह केलॉग्स म्यूसली, ०% अतिरिक्त साखर असलेले केलॉग्स म्यूसली आणि २२% फ्रुट मॅजिक असलेले केलॉग्स म्यूसली यांचा समावेश आहे. जुलै २०२२च्या नेल्सन डेटानुसार, म्यूसली आणि ग्रॅनोला कॅटेगरीमध्ये भारतात केलॉग्सची बाजारपेठ हिस्सेदारी ७०% आहे आणि हा उत्पादन विभाग दोन अंकी वाढीसह वाढत आहे. या ब्रँडने ग्राहकांसोबत अतिशय जवळचे नाते निर्माण केले आहे.


श्री सुमित माथूर, मार्केटिंग-सिनियर डायरेक्टर, साऊथ एशिया, केलॉग यांनी सांगितले,"प्रोटीन भरपूर असलेला, स्वादिष्ट पर्याय ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी केलॉग्स-प्रो म्यूसली हा सकाळच्या घाईत उत्तम ब्रेकफास्ट करण्याचा खूप चांगला पर्याय आहे. पोषण आणि स्वाद या ग्राहकांच्या दुहेरी गरजा डोळ्यासमोर ठेवून अतिशय विचारपूर्वक हे उत्पादन बनवणाऱ्या टीमच्या प्रयत्नांचे मी कौतुक



करू इच्छितो. पॅकेजिंग डिझाईन, पॅकवरील पोषणविषयक माहिती आणि स्वाद या सर्वांमुळे ब्रँड ऍसेट्स वृद्धिंगत झाल्या आहेत."


महाराष्ट्रातील तळोजा येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बनवले जाणारे केलॉग्स प्रो म्यूसली रिलायन्स, डीमार्ट, मोर रिटेल अशा सर्व प्रमुख रिटेल शृंखलांमध्ये उपलब्ध आहे. बिग बास्केटच्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर याचे विशेष लॉन्च करण्यात आले असून इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील ते उपलब्ध करवून दिले जात आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...