Thursday, October 20, 2022

अपोलोने पाच वर्षांत ५३ बाल-यकृत प्रत्यारोपित केले

 अपोलोने पाच वर्षांत ५३ बाल-यकृत प्रत्यारोपित केले

मुंबई आणि पश्चिम भारतात यकृत प्रत्यारोपणाला चालना देण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलसोबत अपोलोचा सामंजस्य करार


अपोलो रुग्णालयाने आजपर्यंत एकूण १७० यकृतासंबंधी प्रकरणे हाताळली आहेत, त्यापैकी ३४ मृत दात्यांच्या प्रत्यारोपणाशी संबंधित आणि १२ आंतरराष्ट्रीय प्रकरणे आहेत. पाच वर्षांत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आणि हा अपोलोच्या हाताळलेल्या प्रगत बालरोग यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या यशाचा पुरावा आहे, अपोलो हॉस्पिटल्सने ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हेपॅटोबिलियरी पॅनक्रियाटिक

प्रत्यारोपण शल्यचिकित्सक प्राध्यापक डॅरियस मिर्झा यांच्या वैद्यकीय नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात विद्यमान यकृत कार्यक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम-अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे मुख्य सल्लागार म्हणून प्रा. डॅरियस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॅरियस हे मागील ४ वर्षांपासून अपोलो हॉस्पिटल्सशी संबंधित आहेत. त्यांनी अलीकडेच बर्मिंगहॅम चिल्ड्रन्स हॉस्पिटल यूकेमधून निवृत्ती स्वीकारली आहे, प्रगत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील त्यांचा जागतिक स्तरावरील दीर्घ अनुभव भारतातील यकृत रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.


नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्स आणि बॉम्बे हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य कराराची घोषणा देखील या प्रसंगी झाली, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात अपोलोच्या प्रगत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाचा लाभ घेतील. दोन आघाडीच्या बहु-वैशिष्ट्ये असलेल्या रुग्णालयांमधील सामंजस्यामुळे अंतिम टप्प्यातील यकृत रोग असलेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाचे सकारात्मक परिणाम मिळतील. दोन्ही संस्था यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी काम करणार आहेत, ज्यामध्ये सर्वोत्तम वैद्यकीय कौशल्य आणि यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये नवीनतम जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती पश्चिम भारतात आणली जाईल. प्रा.डॅरियस मिर्झा, प्रमुख-एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण (पश्चिम क्षेत्र), अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की, "जेव्हा मला अपोलो हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम विकसित करण्याची संधी देण्यात आली, तेव्हा मला सर्व वयोगटातील

आणि विविध जोखीम असलेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाच्या वैद्यकीय सेवेतील संपूर्ण श्रेणी (परिपूर्णता) प्रदान
करण्याच्या माझ्या कौशल्याचा उपयोग करण्यासाठी हे सर्वात योग्य केंद्र आहे असे वाटले. अपोलो हॉस्पिटल्समधील बाल-यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमात आर्थिक-सहाय्य कार्यक्रम आणि स्वयंसेवी संस्थांसोबत केलेल्या सामंजस्य कराराद्वारे निधी उभारणीचे महत्त्वपूर्ण उपक्रमही आयोजित केले गेले आहेत. यामुळे समाजातील वंचित स्तरातील मुलांना त्यांच्या आजारासाठी सर्वोत्तम उपचार मिळतील. यामध्ये प्रत्यारोपणानंतरच्या औषधोपचाराचा देखील समावेश आहे.”


डॉ. राजकुमार पाटील, संचालक, वैद्यकीय सेवा, बॉम्बे हॉस्पिटल्स अँड मेडिकल रिसर्च सेंटर म्हणाले, "बॉम्बे हॉस्पिटल गेल्या ६ दशकांपासून सामान्य लोकांना निस्सीम आणि निःस्वार्थ वैद्यकीय सेवा पुरवते. बॉम्बे हॉस्पिटल यकृत प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमाची योजना करत होते आणि आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या काही रुग्णांनी आधीच नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार घेतले आहेत. यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी अपोलो हॉस्पिटल्सला सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे आणि यामुळे आमच्या डॉक्टर आणि टीमची अंतर्गत क्षमता विकसित होईल, अशी आमची आशा आहे.”

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

 हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!  रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रप...