'रोश डायग्नॉस्टिक्स-अपोलो' चा रक्त-संक्रमण सुरक्षितते साठी कॅम्पेन
रक्तसंक्रमणातून पसरणाऱ्या आजारांचा धोका कमी व्हावा यासाठी जागरूकता या उपक्रमातून केली जाणार
आरोग्य सेवा व्यवस्थेमध्ये रक्तसंक्रमण हा खूप महत्त्वाचा भाग आहे पण रक्ताची मागणी व पुरवठा यामध्ये खूप मोठी तफावत आहे. भारतात दरवर्षी ८.५ ते १० मिलियन युनिट्स रक्ताची गरज आहे तर पुरवठ्याचे प्रमाण दरवर्षी फक्त ७.४ मिलियन युनिट्स इतकेच आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, रोश डायग्नॉस्टिक्स आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड यांनी #IPledgeRED कॅम्पेन सुरु करून सुरक्षित रक्तदान आणि रक्ततपासणी गरजेची असल्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. रक्ताच्या सुरक्षित तपासणीमध्ये नॅट स्क्रीनिंग हे गोल्ड स्टॅंडर्ड मानले जाते, यामुळे हेपटायटिस बी आणि सी व एचआयव्ही यांच्याशी संबंधित संक्रमणातून पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. १८ आणि त्यापेक्षा वरच्या वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वेच्छेने रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ८ पेक्षा जास्त शहरांमध्ये “IPledgeRED” कॅम्पेनचा प्रसार केला जाईल. “IPledgeRED” उपक्रमामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमधील महाविद्यालयांसोबत स्वेच्छेने रक्तदानासाठी सहयोग केला जाईल. जवळपासच्या अपोलो हॉस्पिटल साईट्सवर जाऊन रक्तदान करण्यासाठी तसेच ज्या व्यक्तीला रक्त दिले जाणार आहे त्या व्यक्तीला त्यातून काहीही संसर्ग होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी रक्ततपासणीच्या सुरक्षित पद्धतींविषयी जाणून घेण्याचे प्रोत्साहन या कॅम्पेनमध्ये दिले जाईल. थॅलेसेमिया पेशंट ऍडव्होकसी ग्रुप (टीपीएजी) आणि थॅलेसेमिया इंडिया (टीआय) यांनी या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. श्रीमती संगीता रेड्डी, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप, "सुरक्षित रक्तदानामध्ये अपोलो हॉस्पिटल्स कायम आघाडीवर आहे. नॅट टेस्टिंग सर्वात आधी आम्ही स्वीकारले आणि एचआयव्ही, हेपॅटायटिस बी आणि सी यासारख्या संक्रमणातून पसरणाऱ्या विषाणू संसर्गांचा धोका टाळून सुरक्षित रक्त संक्रमणात आम्ही लक्षणीय योगदान दिले आहे. रक्तदाता आणि रक्त ज्यांना दिले जाते त्या व्यक्ती अशा दोघांनाही रक्तदानाची सुरक्षितता आणि दर्जा याविषयी काहीच शंका राहू नये यादृष्टीने आमच्या ब्लड बँकांमधील प्रक्रिया तयार करण्यात आल्या आहेत. ज्यांना रक्ताची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत फक्त सर्वात सुरक्षित रक्तच पोहोचेल हे नॅटमुळे कसे सुनिश्चित केले जाईल याची माहिती “IPledgeRED” या कॅम्पेनमधून युवकांना करवून दिली जाईल. रोश डायग्नॉस्टिक्सच्या सहयोगाने चालवण्यात येणाऱ्या या कॅम्पेनमधून आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना सुरक्षित रक्ततपासणीबाबत जागरूक करू आणि रक्तसंक्रमणाच्या सुरक्षित पद्धतींचा अवलंब केला जाईल हे सुनिश्चित करू" श्री.नरेंद्र वर्दे, इंडिया-मॅनेजिंग डायरेक्टर, रोश डायग्नॉस्टिक्स यांनी सांगितले, "रोशमध्ये आम्ही असे मानतो की आधुनिक काळातील आरोग्यसेवा क्षेत्रात सुरक्षित रक्त उपलब्ध असणे हा एक सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानला गेला पाहिजे. आम्हाला पक्की खात्री आहे की, अपोलो हॉस्पिटल्सचे नेटवर्क आणि रोश डायग्नॉस्टिक्स यांची रक्त आणि प्लाज्मा नॅट स्क्रीनिंग बाजारपेठेतील लीडरशिप हे एकत्र आल्यामुळे आम्ही राष्ट्रीय स्तरावर रक्तदाता तपासणीमध्ये सुरक्षितता, विश्वसनीयता आणि सक्षमता आणू शकू."
For further information contact:- Rajesh Dabhade 9594061617, Adfactors PR
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST